Breaking News
पौराणिक व ऐतिहासिक स्थळाचे अस्तित्वात नष्ट होण्याची भिती
उरण ः रेवस ते रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतुच्या जागेच्या मोजणी संदर्भात पवन चांडक-उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय उरण येथे 7 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या मार्गाला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला.
उरण तालुक्यातील करंजा येथे समुद्रकिनारी द्रोणागिरी पर्वत वसलेला असून या द्रोणागिरी पर्वताला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक महत्व आहे. द्रोणागिरी किल्ला, डोंगरावरील द्रोणागिरी मातेचे मंदिर हे ऐतिहासिक वारसा आहेत. उरणची ओळख आहे. त्यामुळे हे महत्वाचे वारसे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, मंदिरे नवीन सागरी सेतू मार्गामुळे नष्ट होणार आहेत. त्यामुळे विकास कामांना विरोध नाही मात्र द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मातेचे मंदिर वाचले पाहिजे. त्यांचे अस्तित्व टिकले पाहिजे अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. त्यामुळे तहसिल कार्यालय उरण येथे 7 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या मार्गाला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला.
या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक, चे बोराडे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार, चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे,माजी सभापती ऍड सागर कडू,माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी मेघनाथ थळी मुळेखंड,कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
करंजा रेवस सागरी सेतुला तमाम उरण आणि करंजा गावातील जनतेचा पाठिंबा आहे .परंतु ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व प्राप्त असलेल्या द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता हा मार्ग करण्यात यावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. - सचिन रमेश डाऊर. सामाजिक कार्यकर्ता,उरण.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai