Breaking News
उरण ः रानसई धरण परिसर या ठिकाणी पाणपक्षी गणना करण्यात आली. पक्षी निरीक्षणासाठी सकाळी 7:15 वाजता सुरवात केली व पक्षी गणना 08.54 पर्यंत पक्षी गणना केली. या गणनेमध्ये एकूण 18 पाणपक्ष्यांसह एकूण 33 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी समूहास सापडले व त्यांची नोंद ई-बर्ड या ऍप द्वारे करण्यात आली.
गणनेसाठी सहा. वनसंरक्षक, अलिबाग व उरण वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, उरण वनविभाग उरण चे कर्मचारी ज्ञानेश्वर नामदेव डिविलकर, वनपाल, संतोष बाबाजी इंगोले, वनरक्षक आणि राजेंद्र शहादेव पवार, वनरक्षक ह्यांच्या सोबत फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरण, रायगड (महाराष्ट्र) नोंदणी क्रमांक एफ-5358 (रायगड) संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर व संदीप विश्वनाथ घरत तसेच पनवेल पोयंजे येथील यश अरुण शेट्टी ह्या पक्षीनिरीक्षकांनी पाणपक्षी गणना केली.
उरण तालुक्यास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी रानसई हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या परिसरात मुबलक पाणी व उत्तम अधिवास (जलाशय व गवती माळरान) उपलब्ध असल्याने तेथील जलाशयात अनेक पक्षी आढळतात. दिनांक 19 जानेवारी 2025 च्या पक्षी गणनेत 33 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी येथे पाहण्यात आले. ही गणना करताना जागेवरील वाढता मानवी हस्तक्षेप तसेच खराब व जुनी मासेमारीसाठी वापण्यात आलेले जाळे (घोस्ट नेट) नष्ट करणे.ही आव्हाने व अडथळे आढळून आली. सदर आव्हाने, समस्या वर विविध उपाययोजना सुचविण्यात आले आहे. पाणथळ जागांचे संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून संरक्षणाचे धोरण आखणे, पक्ष्यांना बसण्यासाठी उंचवटे तयार करणे, छुपी शिकार रोखणे, मासिक व वार्षिक गणना उपक्रम नियमितपणे राबविणे.असे उपाय योजना या दरम्यान सुचविण्यात आले आहे.
गणने नंतरची कार्यवाही म्हणून नोंदी ई-बर्ड व स्थानिक वनाविभागासोबत चेक लिस्ट (फोटोसह) पुढे वरिष्ठाकडे पाठविण्यात आली आहे व अहवाल तयार करून तो वनविभागास सुपूर्त करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai