अध्यात्म, राजयोगाच्या प्रचारासाठी शिवसंदेश यात्रा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 205
उरण ः संपूर्ण भारतात व देश विदेशात अध्यात्मिक व राजयोग संदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय तर्फे मार्गदर्शन केले जाते. भाविक भक्तांना अध्यात्म व राजयोगाचे योग्य मार्गदर्शन या विदयालय (केंद्र)च्या माध्यमातून दिले जाते. याच संस्थेच्या माध्यमातून अर्थातच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंतर्गत राजयोगिनी तारादीदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवसंदेश यात्रा काढण्यात आली. या शिव संदेश यात्रेत 100 हुन अधिक भाविक भक्त सहभागी झाले होते.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून समाजप्रबोधन करण्याचे काम ही संघटना करीत आहे. उरणमध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवसंदेश यात्रा काढण्यात आली. पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते या शिवसंदेश यात्रेचे उदघाटन झाले. श्रीफळ वाढवून, हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरवात झाली. उरण शहरात स्वामी विवेकानंद चौक ते एन आय हायस्कूल, महात्वली, नागाव, विमला तलाव या मार्गाने ही शिव संदेश यात्रा काढण्यात आली. विमला तलाव येथे या यात्रेचा समारोप झाला. दरवष शिव संदेश यात्रेचे आयोजन करण्यात येते. यावष या शिव संदेश यात्रेत 100 हुन अधिक भाविक भक्त सहभागी झाले होते. नागरिकांना, भाविक भक्तांना अध्यात्मिक ज्ञान मिळावे, राजयोगाची माहिती व्हावी, महाशिवरात्रीचे महत्व कळावे, अध्यात्म व राजयोगाचा प्रचार व प्रसार व्हावा या अनुषंगाने सदर शिव संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ब्रह्मकुमारी तारादीदी यांनी दिली. त्यानंतर भारतीय जनता पाटचे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर यांच्या हस्ते शिव ध्वजारोहण झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या दिवशी अध्यात्मिक रहस्य या विषयावर ब्रह्मकुमारी तारादीदी यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन केले. उरण शहरातील पालवी हॉस्पिटल समोर असलेल्या अयोध्या अपार्टमेंट, महानगर बँकेच्या वरती, पहिला मजला येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे केंद्र आहे. या ठिकाणी दररोज सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 5 ते 7:30 या वेळेत अध्यात्मिक ज्ञान व राजयोगाचे मार्गदर्शन विनामूल्य केले जाते.अशा या अध्यात्माचा व राजयोग मार्गदर्शनाचा नागरिकांनी, भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी तारादीदी यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai