स्नेहल पालकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2025
- 567
उरण ः मास्टर्स गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित केलेली 7 वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा 6 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत राऊरकेला, ओरिसा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी चे अध्यक्ष आणि श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स आणि करिअर अकॅडमी दादरपाडाचे सहाय्यक प्रशिक्षक स्नेहल राम पालकर यांनी 35 वर्षावरील पुरुष या वयोगटात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. तर 1500 मीटर धावणे या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे. तसेच त्यांचे खोपोली येथील सहकारी अमित पांडुरंग विचारे यांनी 40 वर्षावरील पुरुष गटात 800 मीटर मधे सुवर्णपदक, 1500 मीटर मधे रौप्यपदक आणि 5 किमोमीटर मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच त्यांचे मार्गदर्शक मनीष वामन खवळे यांनी 55 वर्षांवरील पुरुष गटात उंचउडी मधे रौप्यपदक आणि तिहेरी उडी मधे कांस्यपदक प्राप्त केले. या सर्वांची निवड भारतीय संघातर्फे श्रीलंका येथे होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगडभूषण राजू बळीराम मुंबईकर यांनी तसेच समाजातील विविध मान्यवरांनी कौतुक तसेच अभिनंदन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai