घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळ अत्याधुनिक करणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 342
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा पाहणी दौरा
नवी मुंबई ः घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळावरील प्रक्रिया ही महत्वाची असून त्यादृष्टीने आयुक्तांनी प्रकल्पस्थळावरील अंतर्गत स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश दिले. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ परीक्षणास सुरूवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अधिक अत्याधुनिक करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळाची बारकाईने पाहणी केली.
नवी मुंबई महापालिकेचा तुर्भे एमआयडीसी येथे असलेला शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देशातील उत्तम प्रकल्पांपैकी मानला जातो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळावरील प्रक्रिया ही महत्वाची असून त्यादृष्टीने आयुक्तांनी प्रकल्पस्थळावरील अंतर्गत स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश दिले. तेथे मोकळया जागांवर काही ठिकाणी मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून आणखी मोकळया जागा शोधून तेथेही वृक्षारोपण करण्याच्या सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. या ठिकाणी वृक्षारोपण करताना आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधतेला पूरक अशा देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली असून त्यामध्येही बांबूची मोठया प्रमाणावर लागवड करण्यात आलेली आहे. त्या जागेची पाहणी करून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज साधारणत: 750 मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून तो तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी आणण्यात येऊन त्यावर प्रक्रीया करण्यात येते. त्यामधील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते तसेच सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ बनवून रासायनिक उद्योग, सिमेंट उद्योग, थर्मल पॉवर स्टेशनला दिले जाते. त्याचप्रमाणे यामधील नारळाच्या रिकाम्या शहाळ्यांपासून कोकोपीट वेगळे काढले जाते. त्याच उपयोग नर्सरी व फुलबागा याठिकाणी होतो. तसेच त्यामधील फायबर वेगळे काढले जाउुन त्याचाही उपयोग गादीच्या कुशनमध्ये व मूत बनविण्यासाठी केला जातो. त्यासोबतच काथ्याची निर्मितीही करण्यात येते. याशिवाय एमआरएफ रिसायकलींग इंडस्ट्रीला पाठविले जाते.
या ठिकाणी असलेले बांधकाम व पाडकाम घनकचरा प्रक्रिया स्थळ अधिक उत्तम व सक्षम करण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही जलद करावी तसेच यामध्ये सामाजिक सहभागाचा अंतर्भाव करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच त्याठिकाणी निर्माण होणारे क्रशींग सँड, विविध आकाराची रेती व खडी, पेव्हर ब्लॉक असे बांधकाम साहित्य महापालिका कामांमध्ये कंत्राटदारांनी वापरावे यादृष्टीने नियमावली करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि कचऱ्यापासून गॅसनिर्मिती याबाबतच्या नियोजित प्रकल्पांची कार्यवाही गतीमानतेने करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.
- शालेय विदयार्थ्यांना माहिती देणार
आपल्या शहरातील घनकचऱ्यावर कशा पध्दतीने शास्त्रोक्त प्रक्रिया होते याची नागरिकांना विशेषत्वाने लहान मुलांना माहिती व्हावी यादृष्टीने शालेय विदयार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी आणून त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने माहिती करुन दयावी अशाही सूचना आयुक्तांमार्फत कर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai