जागतिक चिमणी दिवस साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 213
उरण ः जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)- सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर, ता. उरण,जि. रायगड तर्फे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोकडविरा व रुस्तमजी केरावाला फाउंडेशन, जेएनपी विद्यालय, शेवा येथे जागतिक चिमणी दिवस साजरा केला. जागतिक चिमणी दिनानिमित्ताने चिमणीचे आपल्या परिसंस्थेतील महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच चिमण्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून घरटी कशी करता येईल यासाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती
वेस्ट मधून बेस्ट या संकल्पनेतुन पुठ्ठ्याचे रोल, आईस्क्रीम स्टिक व कार्डबोर्ड ही साधने वापरून 37 घरट्यांचे वाटप केले. प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून घरटी बनवून घेतली व ती त्यांनाच भेट दिली. सदर कार्यशाळेसाठी संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी ही या कार्यशाळेचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांशी कार्यक्रमात अनेक गोष्टींवर चर्चा झाली. आजकाल चिमण्या दिसत नाहीत. अंगणातील झाडांवर, घरातील उंच जागा, फोटो, मीटरवर संसार थाटणाऱ्या चिमण्या गायब आहेत. चिऊ-काऊच्या गोष्टीने आपल्या बालपणातील पहिल्या गोष्टीची सुरवात होते. चिमण्या अंगणात येतील व त्यांसाठी एखादे झाड जपले पाहिजे. मानवाने जगताना निसर्गपूरक जीवनशैली कशी जपली पाहिजे. प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण व संगोपन, सेंद्रिय शेती, पाणी संवर्धन, जैवविविधता संवर्धन अशा पर्यावरणीय दृष्ट्या अती महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजच्या जागतिक चिमणी दिवसाच्या कार्यक्रमाकरिता रा.जि.प. शाळा बोकडविराच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी वरसोलकर व उपशिक्षक प्रदीप वाघवले तसेच आरकेएफ जेएनपी (इंग्रजी माध्यम) मुख्याध्यापक भूषण जाधव, शिक्षिका काजल म्हात्रे तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. चिमण्यांची घरटी बनविण्याकरिता रोल्स हे समीर डिजिटलचे प्रो. प्रा. संजय दादा यांनी विनामूल्य उपलब्ध केले. तसेच स्टिकर्ससाठी अंबादेवी टायपिंग अँड झेरॉक्स सेंटर प्रो.प्रा.चंदन पाटील व साईगणेश सेवा केंद्र बोकडविरा प्रो.प्रा. कल्पेश घरत व प्रसाद काठे यांनी या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai