Breaking News
उरण ः कलश इंटरटेनमेंट तर्फे श्लोक पाटील व कल्पना सुर्वे यांच्या संकल्पनेतून त्यांनी साकारलेल्या अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार 2025 हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. उरण मधील सिल्वर ओक रिसॉर्ट येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण 23 महिलांना या सोहळ्यात गौरवण्यात आले.
भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, शैलजा घरत, राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर व माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर महिलाही उपस्थित होत्या. आलेल्या मान्यवरांचे लेझीम च्या गजरात स्वागत झाले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्लोक पाटील आणि कल्पना सुर्वे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी महिलांचा केलेला हा गौरव आहे, त्यांच्या जीवनात आनंदी क्षण दिले आहेत. महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची पोचपावती, त्यांना प्रोत्साहन तसेच इतर महिलांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, प्रत्येक महिलेला तिच्यात असलेल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन, त्यांना गौरवीत करणे, या उदात्त हेतूने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नारी आता अबला नाही तर ती आता प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन त्या क्षेत्रात नावलौकिक कलावंत आहे. आज ती उंबरठ्याच्या बाहेर येऊन स्वताला सिद्ध करत आहे. येथील या कर्तुत्ववान महिलांना भेटून आनंद झाला आहे. शैलजा घरत यांनीही आपल्या मनोगतात महिलांचे मनोबल वाढविले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र एक सुंदर रोपट व देऊन यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
कलश इंटरटेनमेंटच्या संस्थापक श्लोक पाटील व सहसंस्थापक कल्पना सुर्वे या म्हणाल्या की, हा आमचा दुसरा सीजन आहे आम्ही दरवष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करुन जास्तीत जास्त महिलांना या सन्मानास पात्र बनवणार असल्याचे सांगितले.
पुरस्कार कर्त्यांची नावे
1)तृप्ती भोईर (बेस्ट जर्नालिस्ट), 2)संगीता ढेरे (सामाजिक कार्य), 3) मंजिरी प्रभुलकर (रांगोळी कलाकार), 4)निवेदिता मोरे (मेकअप आर्टिस्ट),5)मानसी कदम (वैद्यकीय सेवा), 6)अनु पाटील (स्वयंसहायता बचत गट) 7)दया परदेशी (गर्भसंस्कार आणि आयुर्वेद), 8)उमा अहुजा (बाल शिक्षण आणि समाज कल्याण), 9) सोमिया सिंग (रायझिंग इंडस्ट्री), 10)रचना चक्रवत (शैक्षणिक) 11)विजया तायडे (सोसायटी रजिस्ट्रेशन), 2)चैताली म्हात्रे (बेस्ट टीचर) 13)ममता मोरे (ब्युटी इंटरप्रिंनीयर),14)वनिता पाटील (बेस्ट कोरिओग्राफर), 15)प्रतिभा पाटील (सोशल आयकॉन), 16)संगीता साळुंखे (आध्यात्मिक सेवा), 17)कल्याणी ठाकूर (एस्पीरिंग इंटरप्रिनीयर),18) वर्षा कुडव (आयुर्वेद), 19)संगीता जाधव (सामाजिक कार्य), 20)आकांक्षा भोईर (बेस्ट सिंगर) 21)सविता डेरे (वैद्यकीय सेवा) 22)स्वाती ठक्कर ( ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर), 23)प्रीती मेहता (सेलिंग बिझनेस मॉडेल)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai