Breaking News
उरण ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उरण येथे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या बेजबाबदार वक्तव्याविरुद्ध जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले. त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी केली.
शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुडा व लग्नात खर्च करतात असे या बेजबाबदार वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. प्रत्येक वेळी मंत्री कोकाटे हे शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याने उरणचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांचा मोठया प्रमाणात निषेध करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai