उरण टपाल कार्यालयासाठी जागेची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2025
- 304
इच्छुकांनी 28 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
नवी मुंबई ः भारत सरकारच्या टपाल विभागातर्फे उरण येथे नवीन टपाल कार्यालय स्थापन करण्यासाठी उरण परिसरात भाडे तत्वावर जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 1 हजार 264 चौरस फूट चटई क्षेत्रफळ/बांधकाम क्षेत्रफळ असलेली जागा आवश्यक असून, इच्छुकांनी दि. 28 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन वाशी नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
भारताचे राष्ट्रपती यांच्या वतीने उरण परिसरात टपाल कार्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली जागा भाडेतत्वावर देण्यासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा बिल्डर यांनी अपेक्षित भाडे, उपलब्ध जागेचे क्षेत्रफळ, अटी व शत (काही असल्यास) व जागेच्या तपशीलासह आपले अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी 400703 या कार्यालयाकडे दि. 28 एप्रिल 2025 असून, दुपारी 3.30 वाजेपर्यंत सिलबंद लखोटयात पाठवावेत. जागा निवडताना तिची उपयुक्तता व दैनंदिन पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सदर जागा ही इमारत किंवा इमारतीचा भाग असावा. तसेच सदर जागेचे चटई क्षेत्र/ बांधकाम क्षेत्र हे 1 हजार 264 चौरस फूट(अंदाजे) उरण टपाल कार्यालयासाठी असावे. थोडासा क्षेत्रफळात फरक असला तरी तो ग्राह्य धरला जाईल. अर्जासोबत इमारतीचा बांधकाम आराखडा, जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी, पंचायत परवानगी, 7/12 उताऱ्याची प्रत, वीज व पाण्याचे स्वतंत्र मीटर या संदर्भातील अर्जदाराच्या नावे असलेली आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2025 असून, दुपारी 3.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांची छाननी 6 मे 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, वाशी कार्यालयात अर्जदारांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. अर्ज स्वीकारणे किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार टपाल विभागाकडे असून, कोणतेही कारण न देता अर्ज फेटाळण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवलेला आहे.
अधिक माहितीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी 400703 (दूरध्वनी क्रमांक: 022-27666665/27663113) यांच्याशी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10.00 ते संध्याकाळी 05.00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वाशी नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर मुहम्मद साहिद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai