एल अँड टी कंपनीच्या नोकर भरतीवरून वाद
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2025
- 258
ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोरांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी
उरण ः पागोटे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने कार्यरत झालेल्या एल अँड टी कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांची भरती न होता गावा बाहेरील इतर तरुणांची भरती केली गेली. त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय मिळावा, त्यांना नोकरी मिळावी यासाठी सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्य एल अँड टी कंपनीत गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी पोलीसांनी कठोर कलमे लावून संबंधितांवर गुन्हा नोंद करुन भविष्यातील दुर्घटना टाळावी अशी मागणी पागोटे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
22 एप्रिल 2025 रोजी एल एन्ड टी कास्टींग यार्ड या ठिकाणी सरपंच, ग्रामपंचायत कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ एल. अँन्ड टी. कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ स्वरूप यांना लेखी पत्र देणेकरिता गेले असतात्या ठिकाणी योगेश शेट्टी हा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अरेरावी व एकेरी भाषेत हुज्जत घालु लागला. त्याचबरोबर तेथे असलेल्या किरण हरीभाउ पंडीत याने योगेश याच्यासह सौरभ दिलीप पाटील हा घेउन आलेला गाडीतून शस्त्रे काढून वार करण्याची धमकी व शिवीगाळ केली. याप्रकरणी सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी किरण हरिभाऊ पंडित, जितेंद्र सदानंद पाटील, कुंदन लक्ष्मण पाटील, सौरभ पाटील, अतिश सदानंद पाटील, संतोष विजय पाटील, योगेश शेट्टी यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांवर यापूवही एल. अँन्ड टी. कंपनीला पत्र देण्यास गेले किरण हरीभाउ पंडीत याने शिवीगाळी व धमकी दिल्याने त्याच्याविरुद्घ शिवीगाळ व प्राणघातक हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्ती विरोधात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. कलम दाखल केला नाही. प्राणघातक हल्ला करणाऱ्या वर इतर कलम लावले. त्यामुळे आरोपी मोकाट सुटून परत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. आरोपी मोकाट सुटतील अशा प्रकारे त्यांच्यावर उरण पोलीस ठाणे मार्फत कलम लावल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.
प्राणघातक हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने यानंतर परत अशी घटना घडल्यास त्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दहशत पसरविणाऱ्या व प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास पोलिसांनाच सह आरोपी करून कोर्टात जाणार असल्याची व कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती सरपंच कुणाल पाटील पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी यावेळी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai