Breaking News
उरण : तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 30 या कालावधीकरिता सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. जेएनपीए बंदराच्या कामगार वसाहतीतील बहुद्देशी सभागृहात याची सोडत काढण्यात आली. यामध्ये 17 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे ईच्छुक पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
अनुसुचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच महिला यांच्यासाठी आरक्षण सोडत 23 एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये 35 ग्रामपंचायतीपैकी 17 ग्रामपंचायतींचे आरक्षण महिलांसाठी राखीव झालेआहे. यामध्ये सर्वसाधारण 11 महिला, ना.मा.प्र. 5 महिला तर एक अनुसूचित जमाती महिला, ना.मा.प्र. खुला 4, सर्वसाधारण 11, अनुसूचित जातीसाठी 1 अशाप्रकारे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
यात चाणजे; अनुसूचित जमाती (महिला), हनुमान कोळीवाडा; ना.मा.प्र.(महिला)पिरकोन; ना.मा.प्र. (महिला), म्हातवली;ना.मा.प्र. (महिला)जुई ; ना.मा.प्र. (म), केगांव; ना.मा.प्र.(म), विंधणे; सर्वसाधारण(म), सारडे; सर्वसाधारण(म),पागोटे; सर्वसाधारण (म), बांधपाडा; सर्वसाधारण (म), फुंडे; सर्वसाधारण (म), गोवठणे; सर्वसाधारण(म), पाणजे; सर्वसाधारण (म), पुनाडे; सर्वसाधारण(म), करळसर्वसाधारण(म), नागांव; सर्वसाधारण(म), डोंगरी; सर्वसाधारण(म) यांचा समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai