उरण मार्गावर विनाकारण वाहने उभी केल्यास कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 264
वाहतुक पोलीसांच्या बैठकीत सर्व प्राधिकरणांना सहकार्याची विनंती
उरण ः उरण तालुक्यातील वारंवार होणारे अपघात, पार्किंग प्रश्न, वाहतुक कोंडी यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी उरण तालुका अपघात निवारण समितीने संबंधित प्रशासनाकडे कारवाई आणि समन्वयाची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दि 29 एप्रिल 2025 रोजी ऑफिसर्स क्लब, जेएनपीटी टावूनशिप उरण येथे सर्व प्राधिकरणांची नियोजित बैठक पार पडली. यावेळी रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील अवैध पार्किंग, शहरातील वाहतूक कोंडी, इ. विषयांवर चर्चा करण्यात आली.
जेनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी सुरूवातीला अधिकारी व उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचे प्रयोजन सांगितले व समितीचे निवेदन सादर केले. त्यानंतर उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात तालुक्यातील भिषण अपघात, वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोड आणि महामार्गावर होणारी अवैध पार्किंग इ.बाबत उहापोह केला. उरण तालुका अपघात निवारण समितीने दिलेल्या एकूण 15 मुद्द्यांवर नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांनी सर्व संबंधितांना आपापल्या स्तरावर उचित कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. काकडे यांनी उरण आणि जेएनपीए बंदर परिसरातील रस्ते खड्डे आणि वाहनमुक्त राहावेत यासाठी वाहतूक विभागाने तीन अधिकारी व 15 जादा अंमलदारांची नेमणूक केली आहे. तर वाहतूक आणि गोदाम मालकांनी आवश्यक त्या वेळेत वाहने मागवावी, विनाकारण वाहने रस्त्यावर उभी केल्यास आशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल त्यासाठी उपाययोजना लागू करा अन्यथा कारवाई केली जाईल, अपघात होऊ नये यासाठी सहकार्य करावे, सेवा मार्गावर कंटेनर वाहन बंद पडल्यास ते त्वरित हटविण्यात यावा वाहतूक कोंडी, उरण न्हावा शेवा आणि गव्हाण फाटा या तिन्ही वाहतुकीला अडथळा येणाऱ्या 112 या क्रमांकावर संपर्क कण्याचे आवाहन केले. या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, तिन्ही युनिटचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तसेच सिडको, जेएनपीए, एनएचआयए, नगरपालिका आणि सिएफएस, एमटी गोडाऊन, ट्रान्स्पोर्ट यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्व्हिस रोड किंवा महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, सिफएस मालकांनी आपली वाहने रस्त्यावर न पार्किंग करता कंपनी गेटच्या आतमध्ये घेणे, रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरूस्त करणे, सूचना फलक अद्ययावत करणे, रस्त्यावरील धुळ साफ करणे, सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय साधणे इ. विषयांवर चर्चा करण्यात आली. वाहतूकदारांनी जड वाहने डाव्या बाजूनेच चालवावीत याचे पालन करण्यात यावी. वाहतूक विभागाने लेन कटिंग केसेस कराव्यात, चालकांनी नियम न पाळल्यास कारवाई करणार तसेच मार्गावरील दिशादर्शक फलक, वेगाने वाहने हाकणाऱ्यावर कारवाई करणार, मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी एनएचआय, एमएसआरडीसी, पट्टे आखून घाव्यात पुलावर ओव्हरटेक करू नका, दास्तान, धुतुम येथील अवैध वाहनतळ जेएनपीएने आवश्यकतेनुसार वाहनेच मार्गावर आली पाहिजे. क्षमतेच्या अधिक वाहने येऊ नयेत याची दक्षता घ्यावी इमर्जन्सी वाहनाना अडथळा नाही. जेएनपीए ते सर्व मार्गावरील गूगल मॅपिंग केले जात आहे. सीएफएसएम टी यार्ड गोडावून यांनी शिपाई नेमण्यात यावे अशी सूचना अनावश्यक गतिरोधक हटविण्यात यावेत. उड्डाणपुलावर संकेत दिवे बसविण्यात यावेत. गोडाऊनच्या बाहेरील मार्गावर वाहने उभी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. संदेश देणाऱ्या चार वाहतूक पोलीस वाहनांचा वापर करण्यात यावा. उरण शहर परिसरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे. असे महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले. शेवटी रवी पाटील, विश्वस्त जेएनपीए यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- जनतेला आवाहन
जेएनपीए किंवा उरण परिसरातील मार्गावरील वाहतूक कोंडी, उभी वाहने तसेच खड्डे याची माहिती वाहतूक विभागाला माहिती देण्यासाठी वाहतूक विभागाने 8655354136 हा भ्रमणध्वनी जाहीर केला आहे. यावर छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai