शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी
- by Aajchi Navi Mumbai
- May 23, 2025
- 241
पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत
उरण ः कामगार क्षेत्रात अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिक पणाच्या जोरावर आपलं नाव कमावलेल्या कामगार नेते तथा माजी आमदार विवेकानंद पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले कामगार नेते रवि शांताराम घरत यांच्यावर शेकापक्षाने उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या तालुका चिटणीस पदाची धुरा सोपवली आहे. रविवारी पेझारीच्या पावन भूमीत पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षांच्या भव्य दिव्य अशा मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये उरणची धुरा तरुण तडफदार भाई रवि शांताराम घरत यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. कामगार क्षेत्रात गेल्या काही वर्षात हजारो कामगारांना न्याय मिळवून देतांना त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना सर्वाधिक सोयी सुविधा मिळतील याकडे लक्ष केंद्रित करण्याबरोबरच डी पी डी सारख्या तुघलकी धोरणानंतर कंपनीही वाचली पाहिजे आणि कामगारही जगला पाहिजे या धोरणानुसार कामगार क्षेत्रात आपली वेगळीच छाप पाडल्याचे उरण तालुक्यात पाहायला मिळत आहे. या धुरंदर नेतृत्वातील नेतृत्व गुण ओळखून शेकापच्या वरिष्ठांनी त्यांच्यांवर उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची सोपविलेली धुरा ते अतिशय प्रामाणिकपणे आणि समर्थपणे पेलतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शेका पक्षाचे अर्ध्वयू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या जन्मगावात म्हणजे जासईत बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदाच शेकापचे तालुका चिटणीसपद रवि घरत यांच्या माध्यमातून मिळाले असल्याने जासईत ही या निमित्ताने जल्लोष साजरा करण्यात आला. जासईच्या ग्राम पंचायतीची सत्ता अनेक भले भले येऊनही शेकापचा लाल बावटा कधीही खाली येऊ दिलेला नाही अशा जासई गावातील रवि शांताराम घरत यांच्या रूपाने मिळालेले चिटणीस पद शेकापला उरण तालुक्यात पडझडी नंतरच्या काळात नवी उभारी देईल असा विश्वास शेकापच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
- शेकाप निवडणुका ताकदीने लढणार
शेकापक्ष आत्ता संपला अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना पक्षाने अलिबागच्या पेझारी गावात दणदणीत कार्यकर्ता मेळावा घेत चपराक दिली आहे. या मेळाव्यात पक्षाच्या पडत्या काळात पक्षासाठी ठामपणे उभे राहिलेल्या शेकापक्षाच्या बहाद्दर कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचंड ताकदीने आणि जिद्दीने लढणार असल्याचे सूतोवाच शेकापचे सर्वेसर्वा माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai