Breaking News
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
उरण ः उरण तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रांनांनी समन्वय साधून पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत. नालेसफाईला गती द्यावी. उरण शहरात समुद्राचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेथे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना केल्या.
रेल्वे स्थानकाच्या आढावा घेतल्यानंतर आता खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. सोमवारी खा. बारणे यांच्या उपस्थितीत उरण येथील पंचायत समितीत आढावा बैठक झाली. सिडको, सार्वजनिक बांधकाम, जेएनपीटी, तहसील, वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उरणचे तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, उरण नागरपरीषद मुख्याधिकारी समीर जाधव, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसळ, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, शिवसेना तालुका प्रमुख उरण दिपक ठाकूर, शिवसेना विधानसभा संघटक मनोज घरत, महेंद्र पाटील, उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेघाताई दमडे, शहर प्रमुख सुलेमाण शेख व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करुन नालेसफाईला गती द्यावी. समुद्राचे पाणी येते त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. गेल्या वर्षभरात 54 नागरिकांना सर्पदंश झाला आहे. 125 हून अधिक नागरिकांना मोकाट श्वानाने चावा घेतला आहे. त्याची लस उपलब्ध ठेवावी. वैद्यकीय कर्मचारी वाढवावेत. डास होऊ नयेत यासाठी वेळोवेळी धुरीकरण करावे. जलजीवन अंतर्गत सुरु असलेल्या नऊ प्रकल्पांना गती द्यावी. विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून सुर्यघर, कुसुम योजनेबाबत जनजागृती करावी. या योजनेचा नागरिकांना जास्तीत जास्त लाभ द्यावा. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा. काम पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना द्यावा. रस्त्यावरील खड्डडे बुजवावेत. अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना, सर्व यंत्रणेला दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai