आयसीएलइएस महाविद्यालयात अनोखी शिवजयंती साजरी

नवी मुंबई : शिवजयंतीचे अवचित्य साधून आयसीएलइएस मोतीलाल झुणझुणवाला महाविद्यालयात एक वेगळ्या प्रकारची शिवजयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने पुढाकार घेऊन शिवविचार प्रकट करणारे  लघुनाटय सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिंनीनी भाषण, गाणे, नृत्य, अभिनयाव्दारे उत्कृष्ट पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य व योगदानाचे महत्व सांगुन, महाराजांच्या मावळ्यामधील देशप्रेम, एकनिष्ठता, धाडस या तत्वांना आत्मसात करण्याचा संदेश दिला. उपस्थित प्राचार्य डॉ. पुनम सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे असा संदेश दिला. इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक अश्विनी शिरसाठ, विभाग सदस्य प्राध्यापक सचिन बंडे, सचिन कारंडे सरांच्या मार्गदर्शना खाली कोणत्याही प्रकारची साऊंड सिस्टिम न लावता संस्कृती जपत ही शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.