ऐरोलीमध्ये मार्ग, चौकांचे नामकरण संपन्न

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली विभागात प्रभाग क्र. 11 मध्ये ऐरोली गांव, से.19 पाण्याची टाकी ते साईश्रध्दा अपार्टमेंट पर्यंतच्या रस्त्याचे कै.रामा तिपन्ना कांबळे मार्ग, ऐरोली गांव एकवीरा चौक ते मराठी शाळेपर्यंतच्या रस्त्याचे कै.नारायण कृष्णा मढवी मार्ग, ऐरोली गांव जयश्री प्लाझा सोसायटीच्या समोरील चौकाचे कै.माणिक धर्मा मढवी चौक असे नामकरण समारंभ, तसेच प्रभाग क्र. 14 मध्ये सेक्टर 19 येथील जयश्री सोसायटी ते भांगरे चौकापर्यंतच्या रस्त्याचे कै.सुनिल हनुमंत पाटील मार्ग, सेक्टर 20 येथील राधा कृष्ण कुंज सोसायटी समोरील चौकाचे कै.अनंत विठ्ठल जोशी चौक आणि सेक्टर 20, सांझा चुला हॉटेलसमोरील चौकाचे कै.मोतीबाई शंकर मढवी चौक असे नामकरण समारंभ नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जी प्रभाग समिती अध्यक्ष तथा प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक आकाश मढवी, प्रभाग क्र. 11 चे नगरसेवक राजू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.