उरणमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 18, 2025
- 122
उरण ः शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव हा नाविन्यपूर्ण उपक्रम दि. 16 जून 2025 रोजी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शासनाचे मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी सर्व कार्यालयातील शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शाळेत जाऊन शाळा भेटीच्या माध्यमातून विदयार्थ्यांची उपस्थिती व गुणवत्ता वाढ करण्यासाठी करणे या सहेतूने शाळा भेटींचे आयोजन करण्यात आले होते.
उरण तालुका पंचायत समिती मार्फत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांवर भेटी देण्यात आल्या. उरण तालुक्याचे आमदार महेश बालदी, उरणचे तहसीलदार कदम, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत मॅडम, उरण पोलिस ठाणे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिसाळ तसेच तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव निमित्त शाळांना सदिच्छा भेटी दिल्या. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांचे स्वागत, स्वागत दिंडी, गणवेश वाटप, शूज व सॉक्स वाटप, पाठ्यपुस्तके वाटप, गोड पदार्थांचे वाटप, शाळा मेळावा, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे उरण तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai