Breaking News
12.5% योजनेअंतर्गत देय भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप
उरण ः सिडकोच्या 12.5% योजनेअंतर्गत द्रोणागिरी नोडमधील 319 पात्र लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इरादापत्राचे वाटप करण्यात आले. सिडकोतर्फे सदर भूखंडांसाठी सोडत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय 11 जून 2025 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
द्रोणागिरी नोडमधील प्रकल्पबाधितांसाठी शेवटची सोडत सन 2007 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर आत 2025 मध्ये पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप करण्यात आले. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सह- व्यवस्थापकीय संचालक, गणेश देशमुख, सिडको, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, सिडको, संदीप निचित आणि मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, सिडको, दिपक आकडे आणि पात्र लाभाथ उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील 319 पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी इरादापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रालयातील दालनात उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले. ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यातील 95 गावातील जमिनी संपादित करताना त्यांना 12.5% योजनेअंतर्गत भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेअंतर्गत 94 टक्के लाभार्थ्यांना भूखंडांचे वितरण पूर्ण झाले होते. तर उर्वरित 5.59% भूखंडाचे वाटप शिल्लक होते. त्यामुळे या नोडमधील 319 पात्र लाभार्थ्यांना 12.5% भूखंड वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसार या पात्र लाभार्थ्यांना 1 लाख 90 हजार चौरस मीटर भूखंड क्षेत्राचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या 319 पैकी 24 पात्र लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai