Breaking News
उरण ः नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व शाखाप्रमुख भूमिका या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग प्राचार्य व मुख्याध्यापक कार्यशाळा सोमवार, 21 जुलै रोजी रायगड विभागीय चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून प्राचार्य व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेसाठी सातारा येथून माहिती अधिकारी व नवीन शैक्षणिक धोरण तज्ञ शिवाजी राऊत यांनी नवीन शैक्षणिक धोरण व माहिती अधिकार या वर दोन सत्रात प्रभावी मार्गदर्शन करून प्रशासकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण केले. रयत शिक्षण संस्थेचे कायदा अधिकारी विनोद गोडगे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय चेअरमन यांनी गुणवत्ता वाढ,आणि शिक्षण धोरण यावर मार्गदर्शन करून सर्व सेवकांचे पाठीशी रयत शिक्षण संस्था व आम्ही पदाधिकारी असून सर्व शाळा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड युक्त लवकरच होतील असा विश्वास प्रकट केला. मान्यवरांचे हस्ते नवोदित प्राचार्य व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची ध्येयधोरणे व गुणवत्ता या बाबत विचार प्रकट केले. संस्था मॅनेजिग कौन्सिल सदस्या ठाकूर मॅडम, लाईफमेंबर कोळी, लाईफ वर्कर महेश पाटील, वाशी कॉलेज प्राचार्या नायक मॅडम, वीर वाजेकर कॉलेज प्रभारी प्राचार्य आमोद ठक्कर व विभागातील आश्रम शाळांचे माध्यमिक शाळांचे मुख्याद्यापक उपस्थित होते. मुख्याद्यापक डी सी पाटील यांनी उत्तम सुत्रसंचालन तर सहाय्यक विभागीय अधिकारी जगताप सर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमातून जेई, नीट, स्पर्धा परीक्षाची मांडणी केली गेली. रायगड विभागीय कार्यालयीन सेवकांचे या प्रसंगी मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचीही उपस्थिती मोलाची होती. एकंदरीत अत्यंत उत्साहात व उत्तम प्रतिसादात कार्यशाळा संपन्न झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai