गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2025
- 168
नवी मुंबई ः लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या एका महिन्यांवर आला आहे. यावष बुधवार 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. कोकणच्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच 25 जुलैपासून गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग सुरु झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग 25/07/2025 पासून सुरु झाले आहे. सर्व प्रवासी आरक्षित प्रणाली, ऑनलाईन इंटरनेट तसेच ुुु.ळीलींल.ले.ळप या वेबसाईटवरुन ही तिकीटे बुकिंग करण्यात येतील. कोकण रेल्वेकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे.
या आहेत गणपती स्पेशल गाड्या
1) ट्रेन क्रमांक 01152: सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी स्पेशल (डेली)
2) ट्रेन क्रमांक 01172: सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक () स्पेशल (डेली)
3) ट्रेन क्रमांक 01154: रत्नागिरी - मुंबई सीएसएमटी स्पेशल (डेली)
4) ट्रेन क्रमांक 01104: सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी स्पेशल (डेली)
5) ट्रेन क्रमांक 01167: सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक () स्पेशल (डेली)
6) ट्रेन क्रमांक 01166: मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक () स्पेशल (साप्ताहिक)
7) ट्रेन क्रमांक 01186: मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक () विशेष (साप्ताहिक)
8) ट्रेन क्रमांक 01130: सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक)
9) ट्रेन क्रमांक 01446: रत्नागिरी - पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक)
10) ट्रेन क्रमांक 01448: रत्नागिरी - पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक)
दरम्यान, वरील गाड्यांच्या थांब्या आणि वेळेसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या. तसेच प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai