Breaking News
ओएनजीसी प्रकल्पात आग
उरण ः उरणधील पिरवाड समुद्र किनारी असलेल्या ओनजीसीच्या समुद्रातील तेल विहिरीतून येणाऱ्या वाहिनीला गळती लागून स्फोट झाल्याने भिषण आग लागली होती. या आगीमुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागिरकांत घबराहट पसरली होती. या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा उरणकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उरणमध्ये अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या कार्यरत असून कंपनीमध्ये वारंवार आग लागणे, स्फोट होणे यामुळे उरण मधील विविध राष्ट्रीय प्रकल्प, राष्ट्रीय कंपनी यांची सुरक्षितता तसेच नागरिकांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे. सोमवारी उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी सीआयएसएफ आमि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र अशा घटना ओएनजीसी घटनेत वारंवार घडत असून अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.ओएनजीसीमध्ये अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे उरण परिसरातील तेल,वायू व अतिज्वलनशील पदार्थांची साठवणूक करणाऱ्या वाहिन्यांमधून तेल चोरीच्या घटनांतही वाढ झाली आहे. तालुक्यातील विविध खासगी गोदामात असलेल्या हानिकारक कंटेनरनाही भयाण आगी लागू लागल्या आहेत. उरण परिसराला अग्नितांडवाचा धोका निर्माण झाला असल्याने अग्निरोधक सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट न झाल्याने ओएनजीसी व्यवस्थापनाकडून आगीच्या कारणाच्या शोधासाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या निष्कर्षावरून आगीचे खरे कारण समोर येईल. त्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती ओएनजीसी प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai