Breaking News
उरण ःमे.आय.एम.सी.लि. ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारची रसायने, खाद्यतेले याचा मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठा करते. कामगारांच्या वेतनवाढीचा मागील करार संपुष्टात आल्यानंतर वेतनवाढीबाबत मागणी पत्र कंपनीला देण्यात आले. कामागारांच्या नवीन वेतनवाढीचा करारनाम्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर 06 सप्टेंबर रोजी सदर वेतनवाढीचा करार संपन्न झाला.
उरण जेएनपीटी येथे मे.आय.एम.सी.लि. कंपनीमध्ये कोकण श्रमिक संघ ही मान्यता प्राप्त युनियन आहे. वेतवाढीचा करारनामा संपुष्टात आल्यानंतर नवीन वेतनवाढीचा करारनामाबाबत कामगार नेत्या जनरल सेक्रेटरी ऍड.श्रुती शाम म्हात्रे, सेक्रेटरी- एकनाथ ठोंबरे, स्थानिक युनिट अध्यक्ष रविंद्र भोईर, धर्मेंद्र ठाकुर,रविंद्र ठाकूर, किरण घरत कामगार कमिटी व कंपनीचे अधिकारी हरेष सविता, व्हॉइस प्रेसिडंट सरतेज यादव, जनरल मॅनेजर, नवलेश कुमार रिजनल हेड,नेहरु सुब्रम्हण्यम सि. मॅनेजर फायन्सस, जी.के. श्रीधरन, आय.आर. यांनी वारंवार चर्चा केल्या. चर्चे अंती एकमत झाल्यानंतर दि.06 सप्टेंबर 2025 रोजी सदर वेतनवाढीच्या करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या. कंपनीसोबत सलग हा चौथा करार करण्यात संघटनेला यश आले आहे. पाच वर्षे कालावधी करीता कामगारांना एकूण रुपये 21000 पगार वाढीचा करार करण्यात संघटना यशस्वी झाली. जेएनपी एरियामध्ये आजपर्यतची हि सर्वात मोठी पगारवाढ कामगारनेत्या डॉ. श्रुती म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली झाली आहे.
सदर वेतनवाढीपोटी कामगारांना मुळ पगार, पर्सनल पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, शैक्षणिक भत्ता याचे फायदे कामगारांना मिळणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबाकरीता तीन लाखापर्यंत मेडिक्लेम पॉलिसीचे फायदे, रुपये एक लाख रक्कमेचा वैयक्तिक अपघाती विमा याचे फायदे कामगारांना मिळणार आहेत. सदर करारनाम्यामधील कामगारांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai