दारुबंदीसाठी महिलांची जनजागृती रॅली
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 68
उरण : वशेणी गावातील दारुची दुकाने बंद करा तसेच हळदी व लग्नसमारंभात होणारा अनावश्यक खर्च टाळण्यात यावा यासाठी वशेणी गावातील महिलांनी बुधवारी जनजागृती रॅली काढली होती. ग्रामपंचायत सरपंच अनामिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
उरण तालुक्यातील वशेणी गाव परिसरात गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरु असून देशी दारूचेही अनेक दुकाने आहेत. दारुच्या व्यसनात तरुण पिढी अडकत चालली आहे. वशेणी गावातील वाढते गावठी दारूचे गुत्ते बेकायदेशीर देशी दारूची दुकाने बंद करण्यात यावेत या मागणीसाठी महिलांनी येथील पोलिसांकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र अनेकदा केलेल्या तक्रारींकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात असल्याचे महिलांकडून सांगितले जात आहे. तसेच हळदी, लग्नसमारंभात गावभर आहेर म्हणून देण्यासाठी महागड्या साड्या, दारू-मटणावर अनाठायी खर्च केला जात असल्याची माहिती वशेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिक म्हात्रे यांनी दिली.
महिलांच्या मागणीनंतर वशेणी गावातील अवैध गावठी दारूचे गुत्ते, देशी दारूची दुकाने बंद करुन दारुबंदी करण्याचा ठरावच मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी वशेणी गावातील महिलांनी दारुबंदीच्या मागणी व जनजागृतीसाठी रॅलीही काढण्यात आली होती. दारुबंदी विरोधातील आलेला लढा यश येईपर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्धारही सरपंच अनामिका म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai