अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना सीएससी केंद्रांवर उपलब्ध
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 146
लाभार्थ्यांना मुख्यालयात जाण्याची गरज नाही; वेळ आणि पैशांची होणार बचत
नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्रांच्या माध्यमातून महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महामंडळ आणि सीएससी यांच्यात एक महत्त्वाचा सामंजस्य करार (एमओयु) झाला आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या तरुणांना त्यांच्या गावातच अगदी माफक दरात सेवा उपलब्ध होणार आहेत.
महामंडळाने केलेल्या करारानुसार, महामंडळाचे लाभार्थी त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे अशा सेवा घेऊ शकतात. यामुळे त्यांना योजनेसाठी जिल्हा मुख्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, परिणामी त्यांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी सांगितले. राज्यात 72000 हून अधिक सीएससी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवर पात्रता प्रमाणपत्र (एलओआय), बँक कर्ज मंजुरी (बँक सँक्शन) आणि बँक स्टेटमेंट अपलोड करण्यासाठी प्रत्येकी केवळ 70 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे अनधिकृत एजंटकडून होणारी फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यात लाभार्थ्यांसाठी महामंडळाचे मोबाइल ऍप आणि चॅटबॉट सारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.
या उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना उद्योजक बनवण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट पूर्ण करणे देखील सोपे होऊन जाईल असे ते म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai