Breaking News
उरण ः रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेचे उपशिक्षक तसेच सारडे गावचे रहीवाशी एच. एन. पाटील यांचा लायन्स क्लब ऑफ उरण च्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले.
एच. एन. पाटील हे रयत शिक्षण संस्थेत गेली 26 वर्षे उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. 25 वर्ष ते विविध शाखेत विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. 35 वर्ष क्रिकेट समालोचन, 30 वर्ष निवेदक, तसेच गायन, वादन, लेखन, तज्ञ हिंदी शिक्षक, परीक्षक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात ते सक्रिय सहभाग घेऊन काम करत असतात. त्यांना सन 2005 साली सह्याद्री कला संघ डोळखांब च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, सन 2012 साली राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार, सन 2019 मध्ये रयत शिक्षण संस्था सातारा कडून कार्यक्षम आदर्श गुरुकुल शिक्षक पुरस्कार. तसेच विविध संस्थेच्या माद्यमातून त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक, हिंदी तज्ज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निवेदक म्हणून ते रयत शिक्षण संस्थेत काम करत आहेत.
लायन्स क्लब ऑफ उरण तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबरोबरच सामाजिक योगदानाने समाज उजळविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ सोहळा उरण नगर परिषद शाळेत संपन्न झाला. उरण तालुक्यातून एकूण 15 शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai