34733 जणांनी घेतला शिबिराचा लाभ
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 70
नवी मुंबई ः ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यात एकूण 218 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ 18815 महिला व 15915 पुरूष अशा एकूण 34733 लाभार्थ्यांनी विविध तज्ज्ञांच्या सेवांसह घेतला आहे.
या अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील पालिकेच्या 5 रुग्णालयांमध्ये व 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज महिला व पुरुषांची सामान्य आरोग्य तपासणी तसेच नियोजित वेळापत्रकानुसार विशिष्ट तज्ज्ञ सेवा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 17 सप्टेंबरपासून अभियानांतर्गत ‘स्वस्थ नारी - सशक्त परिवार’ अभियानांतर्गत नवी मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीबद्दल मार्गदर्शनाची विशेष सत्रे घेण्यात आली. यामध्ये मासिक पाळी सुरू होताना शारीरिक विकासामुळे होणारे बदल काय असतात तसेच मुलींना मासिक पाळी का येते, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता कशी राखावी, शरीराच्या विकासासाठी घ्यावयाचा पोषक आहार, मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासावर किंवा अडचणींवर उपाय याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसनही करण्यात आले. या अभियानामध्ये 2264 किशोरवयीन शालेय मुली यांनी समुपदेशनाचा लाभ घेतला. जास्तीत जास्त महिलांनी व बालकांनी यामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai