आभा’द्वारे नोंदणी करणारे वाशी रूग्णालय ‘टॉप थ्री’ मध्ये
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 01, 2025
- 103
रूग्णालयातील रांगांपासून सुटका
नवी मुंबई ः नागरिकांचा केसपेपरसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचत असल्याने आभा उपक्रम हा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी वरदान ठरत आहे. सर्वाधिक आभा टोकन देणारे नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय, वाशी हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम 3 रूग्णालयांपैकी एक आहे. तसेच हे संपूर्ण देशातील निवड झालेल्या 131 रूग्णालयांपैकी एक आणि सर्व महानगरपालिका रूग्णालयांतून निवड झालेले एकमेव महापालिका रूग्णालय ठरले आहे.
आरोग्य सेवांमध्ये डिजीटलायझेशनचा वापर करून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयुष्मान भारत डिजीटल मिशन (एबीडीएम) हा अभिनव उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला असून हे ‘आभा’ ॲप नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरते आहे. यामधील प्राथमिक महत्वाची गोष्ट म्हणजे याव्दारे नागरिकांची रूग्णालयात केसपेपरच्या नोंदणीसाठी रांगेत उभे रहावे लागल्याने खर्च होणाऱ्या वेळेची मोठी बचत होत असून आता क्यू आर कोड स्कॅन करून आभा ॲपव्दारे झटपट नोंदणी होत आहे. या उपक्रमाला पहिल्या दिवसापासूनच वाशी येथील पालिका रूग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रूग्णांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत 5,36,737 इतके टोकन देण्यात आलेले आहेत. रूग्णालयामध्ये येणाऱ्या साधारणत: 65 टक्के रूग्णांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने केली जात आहे. सर्वाधिक आभा टोकन देणारे नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय, वाशी हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम 3 रूग्णालयांपैकी एक आहे. अखिल भारतीय डिजीटल मिशन मार्फत या उपक्रमाकरिता महाराष्ट्रातून 6 मॉडेल फॅसिलिटीची निवड करण्यात आलेली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक रूग्णालय, वाशी हे संपूर्ण देशातील निवड झालेल्या 131 रूग्णालयांपैकी एक तसेच सर्व महानगरपालिका रूग्णालयांतून निवड झालेले एकमेव महापालिका रूग्णालय आहे. त्यामुळे उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आभा ॲप डाऊनलोड करून रांगेत उभे न राहता ऑनलाईन टोकन नंबर त्वरित प्राप्त करून घ्यावा आणि त्यासोबत आभा ॲपवर असलेली आपले वैद्यकीय रेकॉर्ड एकत्रित ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
- अशी असते सेवा
रूग्णांनी आपल्या मोबाईलमध्ये आभा ॲप डाऊनलोड करावयाचे आहे व तो बारकोड स्कॅन करावयाचा आहे. त्यानंतर रूग्णांना टोकन क्रमांक मिळतो. त्यामुळे रूग्णांना केसपेपर काढणे, बाह्यरूग्ण विभागात (ओपीडी) डॉक्टरांना भेटणे यासाठी रांग लावण्याची आवश्यकता भासत नाही. याठिकाणी स्क्रीन बसविलेल्या असून यावर टोकन नंबर आणि कोणत्या डॉक्टरांना कोणत्या रूम नंबर मध्ये भेटावयाचे याची माहिती प्रदर्शित होते. त्यानुसार डॉक्टरी सल्ला व उपचार घेणे अत्यंत सुलभ आणि सोयीचे झाले आहे. - वैद्यकीय रेकॉर्ड डिजीटल स्वरूपात- आभा उपक्रमातील विशेष बाब म्हणजे एबीडीएमच्या माध्यमातून प्रत्येक रूग्णाचे वैद्यकीय रेकॉर्ड त्याने नोंदणी केलेल्या ॲपमध्ये डिजीटल स्वरूपात संग्रहित केले जात असून त्याचा हा वैद्यकीय इतिहास त्याच्यावर पुढे कुठेही करावयाच्या उपचारांसाठी वापरता येणार असल्याने महत्वाचा आहे. याव्दारे डॉक्टरांना रूग्णाची संपूर्ण वैद्यकीय माहिती व इतिहास त्वरित उपलब्ध होत असल्याने त्याच्या आजाराचे निदान करणे आणि त्याच्यावर योग्य उपचार जलद करण्यास मदत होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai