नगराध्यक्ष पदासह 22 उमेदवारांचे अर्ज दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 52
उरण ः उरण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांच्या समवेत भाजपाचे सर्वच्या सर्व 21 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा रायगड जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार, पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी कोटनाका श्री राघोबा मंदिर येथून उरण नगरपरिषद कार्यालय निवडणूक कार्यालयापर्यंत संपूर्ण उरण शहरातून भाजपाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीतील रथामधून आशिष शेलार,भाजपा नेते बाळासाहेब पाटील,आ.महेश बालदी,भाजपा उत्तर रायगडचे अध्यक्ष अविनाश कोळी आणि नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी - शाह शहरातील नागरिकांना संबोधित करीत होते. जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरण्यासाठी निघालेल्या या रॅलीत भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण नगर परिषदेच्या थेट जनतेतून निवडलेल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी शोभा कोळी- शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक 1 मधून रजनी सुनील कोळी(अ),जविंद्र लक्ष्मण कोळी (ब ), प्रभाग क्रमांक 2मधून रिबेका रविंद्र मढवी (अ ), नंदकुमार बाबाजी लांबे (ब),प्रभाग क्रमांक 3 मधून नम्रता प्रवीण ठाकूर (अ),सुरेश वामन शेलार (ब), प्रभाग क्रमांक 4 मधून संदिप शशिकांत पानसरे (अ),रोशनी सचिन थळी( ब),प्रभाग क्रमांक 5 मधून हिदा हमीद सरदार (अ),जसीम इस्माईल गँस (ब), प्रभाग क्रमांक 6 मधून स्नेहल भिमदास कासारे (अ),रिना निलेश पाटील (ब), प्रभाग क्रमांक 7 मधून शाहिस्ता इब्राहिम कादरी (अ),रवी यशवंत भोईर (ब),प्रभाग क्रमांक 8 मधून पूर्वा योगेश वैवडे (अ), रोहित नितीन पाटील (ब), प्रभाग क्रमांक 9 मधून गणेश सदाशिव पाटील (अ),सायली विशाल पाटेकर ( ब ),आणि प्रभाग क्रमांक 10 मधून राजेश मधुकर ठाकूर (अ), सायली सविन म्हात्रे (ब दमयंती वैभव म्हात्रे (क)अशा 21 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांच्या कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा महायुती विजयाची पताका पुन्हा एकदा फडकणार आहे असा विश्वास नामदार आशिष शेलार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai