वास्तुविशारदांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
- by संजयकुमार सुर्वे
- Nov 14, 2025
- 222
पालिका आयुक्तांची ‘नरोवा कुंजरोवा’ भुमिका
नवी मुंंबई ः नवी मुंबई करदात्यांचे सहा कोटी रुपये खर्च करुन वाशी सेक्टर 14 येथे भूखंड क्र. 4 व 5 वर उभारलेल्या बहुउद्देशीय इमारत वापर सुरु करण्यापुर्वीच धोकादायक ठरली आहे. पालिकेने सदर इमारत तोडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नवी मुंबई करदात्यांचे सहा कोटी रुपये बुडवण्यास जबाबदार असणाऱ्या वास्तुविशारद यांना पालिका आयुक्तांनी मोकळीक दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित वास्तुविशारदांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी केली असून पालिका आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.
सिडकोने वाशी सेक्टर 14 येथे भूखंड क्र. 4 व 5 हा मार्केटसाठी आरक्षित केला होता. या भूखंडाचे आरक्षण बदलून नवी मुंबई महापालिकेने सदर भूखंडावर बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे निश्चित करुन सदर काम वास्तुविशारद मे. हितेन सेठी आणि असोसिएट्स यांना देण्यात आले. सदर कामाची निविदा बनवणे, आराखने निश्चित करणे तसेच कामावर देखरेख करणे ही जबाबदारी टाकण्यात आली होती. वास्तुविशारदांनी या इमारतीचे स्ट्रक्चरल आराखने बनवण्यासाठी ऑप्टिमम कन्सलटन्ट चे मालक अजितकुमार त्यागी यांची नियुक्ती केली होती. काम सुरु करण्यापुर्वी स्ट्रक्चरल इंजिनिअरने बनवलेले आराखने हे आयआयटी सारख्या संस्थेकडून पडताळणी करुन घेणे ही वास्तुविशारद मे. हितेन सेठी आणि असोसिएट्स यांची जबाबदारी होती. सदर इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे आराखने व्हिजेटीआयने पडताळणी केले होते असे पालिकेकडून सांगण्यात आले.
सदर इमारतीचा दुसरा स्लॅब टाकून झाल्यावर पहिल्या मजल्यावरचा स्लॅब हा झुकू लागल्याचे महापालिकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब वास्तुविशारद मे. हितेन सेठी आणि असोसिएट्स यांच्या नजरेस आणून दिली. सदर इमारतीचे आतापर्यंत तीन स्लॅब टाकुन झाले आहेत. सदर स्लॅब झुकू नये म्हणून वास्तुविशारदांनी सदर स्लॅबला खालून लोखंडी बीमचा सपोर्ट दिला. तरीही सदर इमारतीचे स्लॅब व बीम झुकू लागल्याने पालिकेने बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतला. सदर काम मे. मोक्ष कन्स्ट्रक्शन्स कंपनी यांना देण्यात आले होते.
सदर इमारतीचे काम 2014 पासून थांबवण्यात आले असून गेल्या 12 वर्षात याबाबत कोणतीही कारवाई ठेकेदार किंवा वास्तुविशारद यांचेवर केली नसल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता, याबाबत निकृष्ठ सेवेसाठी वास्तुविशारद मे. हितेन सेठी आणि असोसिएट्स यांना जबाबदार धरुन करदात्यांच्या नुकसानीची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करणे गरजेचे होते. परंतु, आजतागायत पालिकेच्या कोणत्याही आयुक्तांनी कोणतीही कारवाई वास्तुविशारदांवर केलेली नाही. उलट सदर इमारत तोडून तेथे नवीन इमारत बांधण्याचा घाट शहर अभियंता विभागाने घातल्याचे सुत्रांकडून कळत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुर्वे यांनी पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडे संबंधित नुकसानीची जबाबदारी वास्तुविशारद मे. हितेन सेठी आणि असोसिएट्स यांच्यावर निश्चित करण्याची मागणी केली आहे. पालिका आयुक्त कोणता निर्णय घेतात यावर आपली पुढची भुमिका ठरवू असे सुर्वे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे