उरण ते नवी मुंबई बेस्ट सेवा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 38
उरण ः उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका आहे. दळणा वळणाच्या दृष्टीने उरण तालुका आता विकसित होत चालला आहे. नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु होणार आहे.त्यातच आता बेस्ट सेवेने भर टाकली आहे. उरण मधून मुंबई कुलाबा, नवी मुंबई जाण्यासाठी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेची बेस्ट सेवा सुरु करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे. बेस्ट प्रशासनाने उरण ते बांद्रा स्टेशन पुर्व, उरण ते अटलसेतू मार्गा मुंबई कुलाबा, उरण ते वाशी अशी बस सेवा सुरु केल्याने प्रवाशी वर्गांनी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
नागरिकांनी उरण ते मुंबई , उरण ते नवी मुंबई बेस्ट बस सेवा सुरु होण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. उरण मधील द्रोणागिरी सेक्टर 12 येथे भूपाळी गृह संकुलमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी उरण ते अटलसेतू मार्गा मुंबई या मार्गावर बेस्ट बस सेवा सुरु करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तुषार उत्तम गायकवाड यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई अशी सेवा सुरु झाली आहे. नागरिकांनी, चाकरमानी विद्यार्थी प्रवाशी वर्गांनी याचे श्रेय सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांना दिले आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता भूपाळी गृह संकुल सोसायटी द्रोणागिरी सेक्टर 12 येथून पहिली व दुसरी बस मुंबई व नवी मुंबई कडे रवाना झाल्या. यावेळी एकूण 2 बस आल्या होत्या. या बसेसचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ रजि. द्रोणागिरीचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार,भैरवी सोसायटी अध्यक्ष नवनाथ डोके, भूपाळी सोसायटी सेक्रेटरी लक्ष्मण मोटे,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खंडागळे, भूपाळी सोसायटी, भैरवी सोसायटी, मल्हार सोसायटी नागरिक, ग्रामस्थांनी केले. तर बेस्ट प्रशासनाच्या वतीने परिवहन सेवा चलो बस सेवेचे इन्स्पेक्टर भागवत कांबळे, इन्स्पेक्टर प्रमोद कोकरे उपस्थित होते. या बस सेवेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी नारळ फोडून व सर्वांना पेढे वाटून केले. आता सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, सिडको जेएनपीटी ते मुंबई आणि सिडको जेएनपीटी ते ब्रांद्रा स्टेशन पुर्व असा प्रवास बेस्टच्या बसने करता येणार आहे. बस मार्गाचा नंबर चलो ऍप मध्ये दाखवत आहे. बेस्टने प्रीमियम चलो बस या मार्गावर सुरु केल्याने प्रवाशी वर्गांचे वेळेची बचत होणार आहे. या बेस्टच्या सेवेने नागरिकांना ऐसी मध्ये गारेगार थंड वातावरणात आरामदायी शांततेत प्रवास करता येणार आहे.
बेस्ट परिवहन चलोबस सेवेची वैशिष्ट्य
- रविवार खेरीज सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, सिडको जेएनपीटी ते मुंबई (बांद्रा), सिडको जेएनपीटी ते अटलसेतू मार्गा मुंबई या मार्गावर बस सेवा सुरु.
- रात्री 9 ते रात्री 12:30 या वेळेत सिडको जेएनपीटी ते वाशी, वाशी ते सिडको जेएनपीटी अशी स्वतंत्र बस सेवा सुरु
- चलो बस ऍप डाउनलोड करून ऑनलाईन नोंदणी करूनच बस मध्ये प्रवेश मिळेल.
- चलो बस ऍप मध्ये कोणती बस कुठे आहे. एखादी बस कोणत्या स्थानकावर हे ऍप मध्ये त्वरित कळणार.
- प्रीमियम सेवा (व्हीआयपी सेवा )असल्याने ऑफलाईन सेवा कायमस्वरूपी बंद आहे. म्हणजेच प्रवाशांना कधीही कुठेही डायरेक्ट बस मध्ये चढता येणार नाही. ऑनलाईन बुकिंग असेल तरच बस मधून प्रवास करता येणार आहे.
- द्रोणागिरी ते अटल सेतू मार्गे मंत्रालय मुंबई अशी बस सेवा सुरु.
- सिडको जेएनपीटी ते बांद्रा
- सिडको जेएनपीटी ते वाशी (नवी मुंबई )
- थंड, वातानुकुलीत शांत आरामदायी प्रवास सेवा
- जलद, सुरक्षित व उत्तम सेवा
- बस सेवेचे वेळापत्रक हे चलो बस ऍप वर पाहता येणार आहे
- बस तिकीटाची रक्कम ऑनलाईन बुकींग करतेवेळी दिसून येईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai