स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची पडझड
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 40
उरण ः देशाच्या स्वातंत्र्य लढयात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके उरण तालुक्यात उभारण्यात आली आहेत. परंतु दुर्लक्षामुळे या स्मारकांची दुरवस्था झाली आहे. या स्मारकांच्या कायमस्वरूपी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी शासनाने स्वीकारावी अशी मागणी हुतात्म्यांच्या वारसांनी केली आहे. त्यासाठी शासन, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये स्वातंत्र्यासाठी दिलेल्या कायदेभंग आंदोलनात ब्रिटिश सरकारच्या गोळीबारात येथील आठ स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. ही स्मारके जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहेत. यातील काही स्मारकांचा गावातील नागरिक आपले खासगी साहित्य ठेण्यासाठी तसेच इतर कामांसाठी करीत आहेत. स्मारकाच्या फरशा उखडल्या असून छप्पर उडाले आहेत. स्मारकातील छत गळून पडले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षक जाळ्याही तुटल्या आहेत. यातील अनेक स्मारकांची पडझड झाली आहे. त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. परंतु या स्मारकांची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हे निश्चित होत नसल्याने यात भर पडू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकांची उभारणी केली आहे. मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आमच्या विभागाची नसून ही स्मारके स्थानिक ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली आहे.
उरण सामाजिक संस्थेच्या वतीने उरणमधील सर्व स्मारकांची सफाई केली जाणार असून येथील वाचनालयही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai