31 पोलिस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानाकंन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 71
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 9 इतर शाखांना आयएसओ मानाकंन देऊन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषांचा अवलंब करुन विश्वासर्हता निर्माण करणे, पोलीस ठाणे आणि शाखांमधील कामकाज वेळेत व कार्यक्षमतेचे पुर्ण करुन जनतेच्या समाधानात वाढ करणे, प्रत्येक कामासाठी निश्चित अशी मानक कार्यप्रणाली तयार करुन ती काटेकोरपणे राबविणे, सर्व कामकाज पारपदर्शक व नियमबध्द पध्दतीने पार पाडणे, कामकाजात येणाऱ्या सर्व त्रुटी दुर करुन नवनवीन उपक्रम आणि संकल्पना राबवून सुधारणा साधणे, सर्व स्तरांवर लोकसहभाग व जनतेचा विश्वास वाढविण्यावर भर देणे हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयास आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय त्यांच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्यासह एकुण 22 पोलीस ठाणे व इतर 9 शाखांमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग व मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष (ईएमसी) अशा एकुण 31 पोलीस ठाणे, इतर शाखांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मंगळवारी (ता.25) गुन्हे आढावा बैठकीचे औचित्य साधून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांना मानांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
1) वाशी परिमंडळ पुरस्कार-: वाशी, एपीएमसी, रबाळे, कोपरखैरणे, रबाळे एमआयडीसी
2) पनवेल परिमंडळ-: खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका
3) तुर्भे परिमंडळ-: तुर्भे एमआयडीसी, नेरुळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, सानपाडा
4) पोर्ट विभाग -: उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी, उलवे
5) इतर विभाग-: गुन्हे शाखा (मुख्यालय), विशेष शाखा आणि प्रशासन, डीसीपी ट्राफीक, सायबर सेल, पोलिस मुख्यालय, मोटार ट्रान्सपोर्ट शाखा, पुरावा व्यवस्थापन केंद्र
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai