उरण रेल्वे मार्गावर 10अतिरिक्त फेऱ्यांची वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 108
प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी मान्य
उरण ः गेली अनेक दिवसांपासून उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गांवर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी वर्ग, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटनानीं केली होती. त्या मागणीला आता यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाने ही मागणी मान्य करुन अतिरिक्त लोकल फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रवाशी वर्गांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबईतील नेरुळ-उरण-नेरुळ व बेलापूर-उरण-बेलापूर या रेल्वे लाइनवरील प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, या रेल्वे मार्गावर खूप मर्यादित लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. परिणामी उरणसह आसपासच्या भागातील लोक सातत्याने लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली होती. नवी मुंबईकरांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सातत्याने यासंदर्भात मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्र सरकारकडे या मागणीसंदर्भात पाठपुरावा केला होता. उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गावर पहाटे 5 वाजल्यापासून रेल्वे सुरु करण्यात यावे व नेरुळ व बेलापूर येथून उरणला येण्यासाठी शेवटची रेल्वे रात्री 11 वाजताची असावी अशी मागणी प्रवाशी वर्गांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या प्रगत आणि सर्वसमावेशक विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या), बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच तरघर आणि गव्हाण येथे नवीन रेल्वे स्टेशन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. तसेच उरणच्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-उरण नेरुळ मार्गावर लोकलच्या चार अतिरिक्त फेऱ्या आणि बेलापूर उरण-बेलापूर मार्गावर लोकलच्या 6 अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार
मुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
अनेक दिवसांची मागणी, प्रवाशांचा पाठपुरावा यामुळे रेल्वेच्या फेऱ्या वाढल्याने समाधान वाटले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. परंतु उरणवरून नेरुळ व बेलापूर जाण्यासाठी पहाटे लवकर रेल्वे फेऱ्या नाहीत, सुविधा नाहीत तसेच नेरुळ, बेलापूर येथून उरणला जाण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत रेल्वे सेवा नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गांचे खूप हाल होतात. आमची शासनाला विनंती आहे कि पहाटे 5 वाजता उरण हुन नेरुळ, बेलापूर जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु व्हावे तसेच रात्री नेरुळ व बेलापूर रेल्वे स्टेशन वरून उरणला जाण्यासाठी शेवटची रेल्वे 11 वाजताची असावी अशी आम्हा प्रवाशांची मागणी आहे. - उरण, रेल्वे प्रवाशी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai