वाहतूक पोलीसांकडून विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा धडे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 41
उरण ः परंपरेने वाहणाऱ्या शिस्तीच्या धारेत नवा उजेड टाकत, उरण वाहतूक शाखेने वेशवी येथील प्राथमिक शाळेतील लहानग्यांना रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भविष्याची पावले सुरक्षित रहावीत, यासाठी पोलीस प्रशासनाने ज्ञानाचा हा सुंदर दिवा पेटवला.
कार्यक्रमात रस्ता ओलांडताना डावीकडेउजवीकडे पाहण्याचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, शाळेच्या बसमध्ये चढताना-उतरताना काळजी घेणे, सायकल चालविताना डावीकडून चालणे, हेल्मेटचे अत्यावश्यक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. मोबाईल किंवा हेडफोन वापरत रस्ता न ओलांडण्यासारख्या आधुनिक काळातील धोक्यांबाबतही विद्यार्थ्यांना सावध करण्यात आले. अपघात दिसल्यास तत्काळ शिक्षकांना माहिती देणे, तसेच 100 किंवा 112 वर कळवणे याबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आली. या प्रबोधन सत्राला सुमारे 40 ते 50 विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. हा उपक्रम दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी पार पडला असून संपूर्ण सत्राचे मार्गदर्शन पोउनि उद्धव सोळंके यांनी उत्साहपूर्ण संयमी शैलीत केले. समाजाच्या उद्याचा पाया असलेल्या या बालकांना सुरक्षिततेचे संस्कार देत उरण वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai