शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 18, 2025
- 51
उरण ः उरण विधानसभा मतदार संघात गेले अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवसेना(शिंदे गट )पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, त्यांची बाजू न ऐकता कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उरण विधानसभा मतदार संघात,कार्यक्षेत्रात प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून विनोद साबळे यांची नियुक्ती केली आहे.ही नियुक्ती कोणालाही विश्वासात न घेता केल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले सामुहिक राजीनामे दिले आहेत.
आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा व शिवसेना पक्ष वाढीला विरोध करून वारंवार मनमानी, एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले सामुहिक राजीनामे संजय मोरे - सचिव शिवसेना, बाळासाहेब भवन, मुंबई यांच्याकडे सुपूर्त केले आहेत.उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर व पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील या पदाधिकाऱ्यांनी त्वरित आपले राजीनामे वरिष्ठाकडे सुपूर्त केले आहे.
उरण व पनवेल तालुक्यातील दोन्ही तालुका प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे वरिष्ठाकडे सुपूर्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षात असणाऱ्या व एकनिष्ठ प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ न बाळगता काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यावर होत असलेला अन्याय या घटनेतून समोर येत आहे. पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून बाजूला केल्याने पदाधिकारी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिले असून अनेकजण राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पद नियुक्ती होत असल्याने व त्याचा फटका पदाधिकारी कार्यकर्त्यांना बसत असल्याने होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai