अमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 33
नवी मुंबई : नवी मुंबई : अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर आठ जणांनी जोरदार हल्ला चढवला होता. यात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या समवेत असणारे पोलीस मित्र जखमी झाले आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. हल्लेखोरांच्या विरोधात उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्ज तस्कर इस्माईल शेख आणि शाहिद खान हे त्यांच्या 10 ते 15 साथीदारांसह उलवे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांच्या नेतृत्वाखाली 10 पोलिसांचे पथक सापळा रचण्यासाठी उलवे येथे पोहोचले. रात्री 11:50 च्या सुमारास संशयित आरोपी दुचाकीवरून येताना दिसले. किरण मांढरे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. मात्र, पोलिसांनी घेराव घालताच तस्करांनी पोलिसांवर प्रतिहल्ला चढवला.
आरोपींनी सर्वात आधी पोलीस खबऱ्यांवर हल्ला केला. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये तस्कर हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर पोलिसांना धमकावताना दिसत आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईतील कायदा आि
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai