उरणमध्ये मविआच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2025
- 32
उरण ः उरण नगरपालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत अटीतटीची झाली होती. निवडणूक काळात संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले होते. उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( श्री शरदचंद्र पवार पक्ष )चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर या विजयी झाल्या आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले भाजपच्या शोभा कोळी शाह, शिवसेना शिंदे गटाचे रुपाली तुषार ठाकूर, अपक्ष असलेले नसरीन इसरार शेख हे पराभूत झाले आहेत.तर 21 नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवार पैकी 12 नगरसेवक भाजपचे तर 9 नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत.
2 डिसेंबर रोजी उरण नगर परिषदेत एकूण 67.92 % मतदान झाले होते. मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे डोळे लागले होते. निकाल 3 डिसेंबर 2025 रोजी लागणार होता मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णया मुळे निकाल पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षे नंतर 21 डिसेंबर 2025 रोजी उरण नगर परिषदेचा निकाल लागला आहे. उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा अशा एकूण 22 पदांसाठी निवडणूक संपन्न झाली आहे. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने सर्व पक्षांच्या गणितात मोठी उलथापालथ झाली होती. योग्य महिला उमेदवारांच्या शोधासाठी पक्षांना धावाधाव करावी लागली होती. या निवडणुकीत 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार होते.
नगराध्यक्षा पद हे जनतेकडून थेट निवडून द्यायचे असल्याने मुख्य लढत अत्यंत चुरशीची बनली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( श्री.शरद पवार गट ), शेतकरी कामगार पक्ष, मनसे, शिवसेना (श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व इतर समविचारी पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना घाणेकर या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मैदानात होत्या, तर भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा कोळी या कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवली. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली ठाकूर हे धनुष्यबाण या निशाणीवर आणि एक अपक्षही रिंगणात असले तरी खरी लढत भावना घाणेकर व शोभा कोळी यांच्यातच झाली होती. उरणकरांच्या नजरा या दोन्ही महिला उमेदवारांच्या विजयाकडे खिळल्या होत्या. कोण नगराध्यक्ष बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता निकाल लागल्याने सर्व उमेदवारांचे निकालचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच खरी लढत झाली होती हे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांच्या 21 जागांवर महाविकास आघाडी व भाजप यातच मुख्य सामना झाला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai