‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे प्रकाशन
- by मोना माळी-सणस
- Jan 13, 2026
- 123
नवी मुंबई ः नेरुळ ज्येष्ठ नागरिक संघ सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे प्रकाशन संपन्न झाले. ज्ये.ना.संघ ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मासिकाच्या ज्येष्ठ लेखिका/संपादिका गीताली वि.मं व मासिकाचे नवी मुंबई समन्वयक डॉ.अजित मगदूम उपस्थित होते. प्रकाशनानंतर उपस्थितांमध्ये चर्चासत्र पार पडले.
‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या प्रकाशनानंतर गीताली वि म यांनी त्यांच्या मनोगतातून समाजातील स्त्री पुरुष विषमता कशी विखुरलेली आहे हे अनेक उदाहरणातून सांगितले. स्त्रियांना देखील सर्व क्षेत्रात मानाचे स्थान मिळायला हवे असे सांगत महिला चळवळ ही पुरुषांच्या विरुद्ध नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे अपेक्षित असून स्त्रियांचे दुय्यमत्त्व काढून टाकून त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवण्याचे जमलेल्या पुरुषांना आवाहन केले. चर्चा सत्रात अनेक श्रोत्यांनी आपल्या शंकेचे निरसन करून घेतले व वरील विषयावरील स्वतःचे मनोगत देखील व्यक्त केले. डॉ.अजित सरांनी कमी वेळेत देखील इतक्या छान पद्धतीने सोहळ्याचे नियोजन केले त्याबद्दल प्रभाकर गुमास्ते आणि सर्वांचे कौतुक केले. अतिशय कमी वेळात या सोहळ्याचे नियोजन ठरवण्यात आले होते. या सोहळ्यासाठी वृषाली मगदूम यांची देखील उपस्थिती लाभली होती. ग्रंथालयाचे पदाधिकारी, नवरंग संस्थेचे पदाधिकारी,ज्ये.ना.संघ नेरुळ कार्यकारिणीचे सदस्य, ग्रंथालयाचे वाचक वर्ग सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
प्रभाकर गुमास्ते यांनी ग्रंथालय राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली व भविष्यातील कार्यक्रम सांगितले. चर्चासत्रात सुचित्रा कुंचमवार, वृंदा परुळेकर, पी.आर. गुप्ता ,घनश्याम परकाळे, गजानन म्हात्रे, परब,सुनील तांबे,गिरीजा,रमेश गायकवाड यांनी आपली मते मांडली त्यामुळे हे चर्चासत्र बहारदार झाले. यातून एक चांगली वैचारिक घुसळण झाली याचे समाधान सर्वांना वाटत होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल सुचित्रा कुंचमवार यांनी केले तर ग्रंथालयाचे खजिनदार रमेश गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस