पालिका निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2026
- 32
नवी मुंबई ः महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणूकीची सज्जता नियोजनबध्द रितीने करण्यात आली आहे. निवडणूकीकरिता 185 ठिकाणांवर 1148 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर व शहरात ठिकठिकाणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज आहेत. 13 जानेवारी रोजी सायं. 5.30 नंतर कोणत्याही प्रकारे जाहीर प्रचार केला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालिकने दिले आहेत.
निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांमार्फत नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे तसेच निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनंजय सावळकर यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 9,48,460 इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये 5,16,267 पुरुष व 4,32,040 महिला आणि 153 इतर मतदार आहेत. निवडणूकीसाठी 8 विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापित असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येत असून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी दिव्यांग व वृध्द नागरिक यांच्याकरिता व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मदतीसाठी स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान केंद्र अधिकारी व शिपाई अशा एकूण 6890 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झालेली आहेत. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही सज्ज असणार आहे.
निवडणूकीकरिता 1400 हून अधिक कंट्रोल युनिट व 3700 हून अधिक बॅलेट युनिट प्राप्त झालेली असून सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी करण्यात आलेली आहे. सर्व मतदान यंत्रे सिलबंद करुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्राँग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगव्दारे नियंत्रण कक्षामार्फत बारकाईने लक्ष राहणार आहे. प्रत्येक विभागामध्ये एक महिला स्पेशल-सखी मतदान केंद्र (पिंक बूथ) तसेच पर्यावरणशील आदर्श मतदान केंद्र (ग्रीन बूथ) स्थापित करण्यात येत आहेत. निवडणूकीच्या कामकाजाकरिता 192 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना नेमून दिलेल्या भागातील मतदान केंद्रांवरील कामकाजावर त्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर व शहरात ठिकठिकाणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज आहेत. मतदान साहित्याचे वितरण व संकलन कामासाठी स्वतंत्र कर्मचारीवृंद ठेवण्यात आला असून मतमोजणीसाठीही आवश्यक कर्मचाऱ्यांची आठही विभागांकरिता नेमणूक करण्यात आली आहे व त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. 14 जानेवारी रोजी मतदान साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर गेल्यानंतर तेथे मतदानासाठी साहित्य मांडणी करुन झाल्यानंतर निवडणूकीसाठी नियुक्त महिला कर्मचाऱ्यांकरिता नजिकच्या परिसरात निवास व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक वाहन व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे. 13 जानेवारी रोजी सायं. 5.30 नंतर कोणत्याही प्रकारे जाहीर प्रचार केला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालिकने दिले आहेत. निवडणूक पारदर्शक, निर्भय, मुक्त व शिस्तबध्द वातावरणात पार पडण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द असून निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यासाठी सर्वंकष व व्यापक तयारी करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai