रिया ठरली मिस नवी मुंबई

नवी मुंबई ः मिस नवी मुंबईच्या नवव्या पर्वाचा अंतिम सोहळा वाशी येथील सिडकोच्या सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्‍या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई 2020 चा ताज रिया मेक्कट्टुकुलूम या सौंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसर्‍या व तिसर्‍या जागेवर अनुक्रमे निमिषा पराशर व प्रकृती राव हिने बाजी मारली. परीक्षक म्हणून मिस दिवा सुपर नॅशनल 2019 शेफाली सूद, मॉडेल व अभिनेता जितेश निकम, डॉ.हनी, संजीव कुमार, अशोक मेहरा, यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.

या स्पर्धेचे हे नववे पर्व असुन या वर्षी शेकडो मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या फक्त सोळा सौंदर्यवती अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. या माध्यमातून आम्ही सामान्य घरातील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत म्हणूनच मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक या पूर्वी चमकलेत आणि तर या स्पर्धेतील सौंदर्यवतीआंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडत आहे अशी माहिती आयोजक यू अँड आय एन्टरटेन्टमेंट चे हरमीत सिंग यांनी दिली. मनमित सिंग यांच्या संन्यास या बँड ने आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेष म्हणजे याच स्पर्धेची एक स्पर्धक सुमन राव जी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड आशिया 2019 ची विजेती आहे. तिने आपल्या आठवणींना उजाळा दिला तसेच तिचा यावेळी तिच्या उत्तुंग भरारीचा संक्रमण करण्यात आला. या कार्यक्रमाला राहुल बनसोडे, राजू शिंदे, सुरन्दीर सिंग व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. उत्कंटा वाढवणारी ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या फेरीमध्ये संप्पन झाली. ज्यामध्ये पारंपारिक कपड्यांची फेरी ही रिचा हावरे (राजकुमारी) यांनी डिजाईन केलेल्या ऑउटफिट्स ची होती. इतर दोन फेर्‍या या अनुक्रमे जे डी इन्स्टिटयूट ऑफ फॅॅशन वाशी व घाटकोपर आय आय डी टी खारघर यांनी डिजाईन केलेल्या ऑउटफिट्स च्या होत्या.