बीज देवाण-घेवाण दिवस उत्साहाने साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 28
नवी मुंबई ः 31 जानेवारी रोजी बीज देवाणघेवाण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. पालिका क्षेत्रातील विविध उद्यानांमध्ये बीज देवाण-घेवाण व संकलन आणि बीजगोळा निर्मिती प्रशिक्षण असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.
बेलापूर विभागात डॉ. केशव हेगडेवार उद्यान सेक्टर 1 सीबीडी बेलापूर (मँगो गार्डन), घणसोली विभागात सेंट्रल पार्क सेक्टर से- 3 घणसोली, कोपरखैरणे विभागात सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यान, वाशी विभागात स्व.राजीव गांधी उद्यान से- 29 वाशी, ऐरोली विभागात स्व. राजीव गांधी उद्यान से- 3 ऐरोली, तुर्भे विभागात संवेदना उद्यान से-10 सानपाडा तसेच कोपरखैरणे येथील नमुंमपा शाळा क्र. 31 व शाळा क्र. 36 येथे लोकसभागातून उत्साहात संपन्न झाले. या विशेष दिवसाचे औचित्य साधून नागरिकांना व विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीचा संदेश व बीज गोळे तयार करणेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये नवी मुंबईतील नागरिक, बचतगटातील महिला, विद्यार्थी, महाविद्यालयांच्या एनएसएस युनिटमधील विद्यार्थी, वृक्षप्रेमी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विविध पर्यावरण प्रेमी संस्था, सेवाभावी मंडळे, नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या बीज देवाण-घेवाण उपक्रमामध्ये प्राधान्याने देशी वृक्षांच्या बीजांचेच आदान प्रदान करण्यात आले. चिकू, फणस, जाम, पेरू, चिंच, सिताफळ, जांभूळ, आवळा, स्टार फ्रूट आणि आंबा, यासारख्या झाडांच्या बियांचे देवाणघेवाण करणे हा कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच बीजगोळे तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. सदर कार्यक्रमांतर्गत माता अमृतानंदमयी मठ नेरूळ या संस्थेमार्फत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी येथील एनएसएसचे विद्यार्थी यांना प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच कोपरखैरणे येथील महिला बचत गट, इच्छापूर्ती श्री गणेश मंडळ कोपरखैरणे व क्राईस्ट ॲकॅडमी स्कुल से. 23 कोपरखैरणे येथील 50 विद्यार्थ्यांसह वृक्षप्रेमी नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण जागृतीचा संदेश प्रसारण व बीज गोळे तयार करणेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai