हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी डीप क्लिनिंग
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 22
मैदाने तसेच मोकळ्या जागांच्या साफसफाईची विशेष मोहीम
नवी मुंबई ः शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामांवरील वायू प्रदूषण नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याप्रमाणेच हिवाळी कालावधीत हवेत धुक्याबरोबरच धूळीचेही वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन ठिकठिकाणी डीप क्लीनिंग मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.
‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणा’ कडे अधिक काटेकोर लक्ष दिले जात असून त्यासोबतच नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मैदाने तसेच मोकळ्या जागा साफसफाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण स्वच्छता विभाग धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृतीशील झालेला आहे. त्यासोबतच आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार सर्व विभाग कार्यालयांच्या स्तरावर सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या मार्गदर्शनानुसार अभियंते व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता अधिकारी यांची पथके कार्यान्वित करण्यात आली असून सखोल स्वच्छता मोहीमांप्रमाणेच धूळ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या मोहिमेंतर्गत 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालवधीत साधारणतः 6 टनाहून अधिक धूळ, माती व राडारोडा उचलून नेण्यात आला आहे. प्राधान्याने 12 मुख्य रस्त्यांवर 10 कि.मी. पेक्षा अधिक अंतराच्या रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. रस्ते हे धूळ, माती उचलून स्वच्छ केल्यानंतर ते जेटींग मशीन व एनकॅप फॉगर्स वाहनांव्दारे धुवून स्वच्छ केले जात आहेत. यांत्रिक सफाई मशीन वाहनांव्दारे दैनंदिन 223 किमी मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात आलेली आहे.
आम्र मार्ग, ठाणे- बेलापूर मार्ग, सायन पनवेल हायवे वाशी, एमआयडीसी क्षेत्रातील गवळीदेव मार्ग, पामबीच मार्ग, कोपरखैरणे घणसोली पामबीच मार्ग, पामबीच सर्व्हिस रोड, सानपाडा परिसर, तुर्भे वार्ड लुब्रिजोल कंपनी समोरील फायजर रोड, तुर्भे एमआयडीसी रोड, गणपती पाडा मुख्य रस्ता, रबाळे एमआयडीसी, निबाण टेकडी ते साईप्रसाद हॉटेल परिसर घणसोली, दिवानाका ते मुरबादेवी चौक रबाळे, घणसोली रस्त्यांची त्याचप्रमाणे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांची व परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. यापुढेही ही कार्यवाही सुरूच राहणार आहे . यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाची ब्रशने स्वच्छता करणे व जमा झालेली माती वाहून नेणे, स्वच्छ केलेल्या रस्त्यांवर प्रक्रियाकृत पाणी स्प्रेइंग करुन रस्ते धुणे, रस्त्याच्या कडेला पडलेला बांधकाम राडारोडा यांचे निर्मूलन करणे, पदपथांचीही स्वच्छता करणे अशा विविध प्रकारे सखोल स्वच्छता करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे या स्वच्छता कामाकरिता खालीलप्रमाणे साधन सामग्री वापरण्यात येत आहे. यामध्ये -
जेटींग मशीन - 08
यांत्रिक सफाई मशीन - 07 दैनंदिन साफसफाई
फॉगर्स वाहने - 05
फ्लीपर मशीन - 150
विशेष डीप क्लिनिंग मोहिमेत सहभागी स्वच्छताकर्मी - 250 हून अधिक
या सोबतीनेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मैदाने तसेच मोकळ्या जागा यांच्या स्वच्छतेची विशेष मोहीम सर्व विभाग कार्यालयांच्या स्तरावर राबविण्यात आली. यामध्ये खालील मैदानांची साफसफाई करण्यात आली. भास्कर घाडी मैदान सेक्टर 5 ऐरोली, कोपरी गावदेवी मैदान तुर्भे, गावदेवी मैदान सेक्टर 5 सानपाडा, कोपरखैरणे सेक्टर 6 ओपन प्लॉट, सेक्टर 5 ते 8 मैदान कोपरखैरणे, रेल्वे स्टेशन कोपरखैरणे पार्किंग, तेथील मोकळा परिसर, सुभाषचंद्र बोस मैदान सेक्टर 1 वाशी, जुहू गाव गावदेवी मैदान वाशी, मोकळी मैदाने सेक्टर 29 वाशी, मीनाताई ठाकरे मैदान सेक्टर 16 वाशी, आयसीएल शाळे समोरचे मैदान से 15 वाशी, घणसोली सेक्टर 6 खेळाचे मैदान, घणसोली सेक्टर 7- 8 रस्त्याशेजारील मोकळी जागा इ. परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वायु प्रदूषण प्रतिबंधाकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले जात असून त्यादृष्टीने वायू प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai