23 वाहनांची चोरी करणारी चौकडी जेरबंद
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 42
नवी मुंबई : गाडी चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरुन युट्युब वर व्हिडिओ पाहून त्याआधारे वाहन चोरी करणारा आणि त्याचे 3 साथीदार अशा चार जणांना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. चौकशीत त्यांनी 23 ठिकाणी वाहन चोरीची कबुली दिली असून हि वाहने जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे.
संतोष ढोले(45), लक्ष्मण मासाळकर(34), संजीव सक्सेना(52) आणि कैलास चौधरी (38) असे अटक संशयीत आरोपींची नावे आहेत. यातील संतोष ढोले हा या टोळीचा सूत्रधार आहे. संतोषने गाडी चोरी करण्यासाठी समाज माध्यमाचा आधार घेतला. यात गाड्यांचे कुलूप कसे तोडायचे, किल्ली नसताना गाडी कशी सुरु करायची असे चित्रण पाहून त्याचे प्रात्यक्षिक त्याने अनेकदा केले. आपण आता गाड्या चोरी शकतो याचा विश्वास त्याला आल्यावर अन्य साथीदारांची जमवाजमव त्याने केली. गाड्यांची रेकी करणे विकणे गाडी जुनी खराब असेल तर त्याचे भाग विकणे हि कामे अन्य साथीदार करत होते. तसेच चोरी केलेल्या वाहनावर त्याचे नावे असलेल्या वाहनांच्या क्रमांक पाटी बदलणे बनावट कागदपत्रे बनवून ती विक्रीही केली जात असल्याचे; तपासात निष्पन्न झाले. तपास पथकाने अटक आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण व तांत्रिक तपासातुन मुंबई व उपनगर परिसरामधील 18 मोटारसायकल चोरीचे व 05 रिक्षा चोरीचे एकुण 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
खारघर पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी आणि मोबाईल लोकेशन असा तांत्रिक तापास करण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पाहणी करून तांत्रिक माहिती उपलब्ध केली. तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून गुन्हयातील आरोपीचे चित्रण खबरी आणि मुंबई ठाणे व परिसरातील पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आले. त्याला यश आले आणि आरोपी हे डोंबिवली, कोळेगाव येथे असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावेळी तात्काळ तपास पथक पाठवण्यात आले. या पथकाने नेवाळी फाटा, कोळेगाव, डोंबिवली, पूर्व येथे सपाळा रचुन 4 आरोपींना ताब्यात घेतले. उकल गुन्हे हे नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत घडले आहेत तर या शिवाय भांडुप, नेरळ, येथेही त्यांनी वाहन चोरी केल्याचे उघड झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai