गरजेपोटीच्या घरांची शास्ती रद्द करण्याची नाईकांची सूचना
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 32
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीतील गाव गावठाण आणि इतर सर्व गरजेपोटीच्या घरांना लावण्यात आलेली जाचक शास्ती रद्द करण्याची सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मागील पाच ते सहा वर्षांमध्ये महापालिका प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्यासाठी समिती गठीत करण्याची सूचना देखील दिल्या आहेत.
वनमंत्री नाईक यांनी रविवारी नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, माजी महापौर आणि विद्यमान गटनेते सागर नाईक यांची बैठक घेतली. निवडणुकीनंतर जनहिताच्या आणि शहरी विकासाच्या दृष्टीने निर्णय घेण्याचे निर्देश नाईक यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. नवी मुंबईमध्ये गाव, गावठाण तसेच इतर गरजेपोटीची घरे बांधण्यात आली आहेत. त्याला प्रशासनाने तीनपट शास्ती आकारली आहे. ही शास्ती रद्द करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेमध्ये पटलावर विषय घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी तसेच सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी मागील 5 ते 6 वर्षांमध्ये नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरु होता. प्रशासकीय कालावधीत झालेल्या कारभाराविषयी अनेक आक्षेप नोंदवले गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कालावधीतील कामकाजाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी एक श्वेतपत्रिका काढण्यासाठी देखील उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मंत्री नाईक यांनी शब्द दिल्याप्रमाणे मागील 25 वर्षे नवी मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी वाढ करण्यात आलेली नाही. भविष्यात देखील मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी वाढविण्यात येणार नाही, असा शब्द वनमंत्री नाईक यांनी नवी मुंबईच्या जनतेला दिलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याच्या दृष्टीने देखील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा, ठोक मानधन कामगारांचे विषय, अन्य कर्मचारी आणि कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न असे विषय येत्या महापालिकांच्या सर्व साधारण सभांमध्ये मार्गी लावण्यात येणार आहेत. महापालिकेच्या विविध विषय समित्या गठीत करण्याची कार्यवाही सुरू विविध विषय समित्या गठीत करण्याची सूचना नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांना दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai