नमुंमपा पदभरती अर्जासाठी मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 36
नवी मुंबई ः महापालिकेच्या नियमीत आस्थापनेवरील गट-अ मधील 15 संवर्गातील, गट-ब मधील 3 संवर्गातील व गट-क मधील 2 संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदांवर पदभरती साठी परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास दि.01 मार्च 2026 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यत मुदतवाढ दिली आहे. याच वेळेपर्यंत ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही करायची आहे.
महानगरपालिकेकडून 14 डिसेंबर 2025 रोजी नियमित आस्थापनेवरील सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अंतर्गत गट-अ मधील 15 संवर्ग, गट-ब मधील 3 संवर्ग आणि गट-क मधील 2 संवर्ग अशा एकूण 20 संवर्गांतील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आस्था/02/2025, आस्था/03/2025 आणि आस्था/04/2025 या जाहिरात क्रमांकांद्वारे जाहीर करण्यात आली होती. सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीला अर्ज सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक कालावधी मिळावा आणि अधिकाधिक इच्छुकांना संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, 14 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील तसेच 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पात्रता निकष, वयोमर्यादा, आरक्षण, परीक्षा पद्धती, शुल्क संरचना आणि इतर सर्व बाबी पूर्ववत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास दिनांक 01 मार्च 2026 रोजी, रात्री 11.55 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच विहित पध्दतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही दि.01 मार्च 2026 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. महत्वाचे म्हणजे दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी प्रसिध्द जाहिरातीमधील व दि. 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या शुध्दीपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही याचीही नोंद घेण्यात यावी असे पालिका प्रशासनाच्याने सूचित केले आहे. या मुदतवाढीमुळे उशिरा तयारी पूर्ण करणाऱ्या तसेच तांत्रिक कारणांमुळे अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai