परिवहन समिती सदस्य निवडणूक वादग्रस्त
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2026
- 27
बहुमताच्या जोरावर भाजपने निवडले 12 सदस्य; विरोधकांचा सभात्याग
नवी मुंबई : महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वाद झाले. संख्याबळानुसार सदस्य नेमणुक व्हावी ही विरोधकांची मागणी झुगारुन सत्ताधाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरु केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षोने महापौरांचा निषेध व्यक्त करुन महापैौरांना घेराव घातला. महापौरांनी सभा काही काळासाठी तहकुब केली. सभा सुरु झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर 12 सदस्य निवडीस सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांच्या या मनमानीमुळे विरोधीपक्षाने सभात्याग केला.
परिवहन समिती सदस्य निवडीसाठी शुक्ररारी आयोजित केलेली तहकुब सभा सोमवारी पार पडली. मात्र या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समितीवर 12 सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सभागृहनेते सागर नाईक यांनी तौलनिक संख्याबळाऐवजी मतदानाद्वारे सदस्य निवडीचा मुद्दा मांडला. विरोधीपक्षनेते विजय चौगुले, शिवराम पाटील, किशोर पाटकर यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतले. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे म्हणणे न जुमानता परिवहन सदस्यपदासाठी नावं सुचविण्यास सुरूवात करुन मतदान प्रक्रिया सुरु केली. मात्र विरोधकांनी त्याला तीव्र विरोध केला. महापौरांचा निषेध करुन शिंदेसेनेच्या नगरसेविकांनी महापौराच्या डायससमोर जाऊन निदर्शने केली. वाद वाढून सभागृहात गोंधळ झाल्यामुळे अखेर महापौर सुजाता पाटील यांनी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले.
परिवहन समितीसाठी भाजपकडून 12 तर शिवसेनेकडून 5 सदस्यांची नावे सुचवण्यात आली होती. सभागृहाचे कामकाम पुन्हा सुरू झाल्यानंतर सभागृह नेते सागर नाईक यांनी परिवहन समिती सदस्यांची निवड नियम क्रं. 25/ब अन्वये घेऊन सभागृहाच्या सदस्यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. भाजपाने बहुमताच्या बळावर 12 सदस्यांची निवड केली. शिवसेनेने सूचवलेल्यापैकी एकही सदस्य न घेतल्याने विरोधकांनी सभात्याग केला. हा वाद चिघळल्यामुळे शिवसेनेने न्यायालयात जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडीच्यावेळी मनसे व शिवसेनेचे असे 3 सदस्य तटस्थ राहिले होते.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी परिवहन समितीच्या या रचनेवर आक्षेप घेतला. ही निवड नियमबाह्य असल्याचा आरोप करत संख्याबळाच्या तुलनेत प्रतिनिधित्व दिल्याचा आरोप करत निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर सत्ताधारी भाजपने नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्यात आल्याचे सांगत विरोधकांचे आरोप फेटाळले. तसेच महापालिका सदस्यांव्यतिरिक्त सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत महापौरांच्या आसनासमोर जमिनीवर बसून आंदोलन केले.
12 परिवहन सदस्य नेमणूक
- राहुल चंद्रकांत शिंदे, राजेश हौसला राय, विकास कुंडलिक झंझाड, शितल श्रीपत भोईर, रोशन रामचंद्र पाटील, राजश्री नारायण कातकरी, विनोद तुळशिराम म्हात्रे, श्री.यशपाल सिद्राम ओव्हाळ, श्री.कुणाल प्रकाश महाडिक, श्री.हनुमंत कोंडीबा रोडे, श्री.अभिजीत प्रकाश पेडणेकर, श्रीम.तिर्था मारूती सकपाळ आदी मान्यवरांची निवड झाली असून त्यांचे महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत आणि आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai