जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2026
- 27
नवी मुंबई ः दि. 8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेमार्फत महापालिका क्षेत्रातील ‘विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना पुरस्कार’ वितरण तसेच महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांनी उत्पादित केलेल्या साहीत्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये महिलांकरीता समुह गायन स्पर्धा, महिला भजनी मंडळ भजन स्पर्धा, लहान व्हिडीओ स्पर्धा (विषय : महिला सुरक्षितता विषयक जनजागृती, पर्यावरण, शिक्षण), समुह नृत्य स्पर्धा (विषय कोळीनृत्य), समुह नाटिका स्पर्धा आणि मंगळागौर स्पर्धा अशा 6 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरी महात्मा फुले स्मृती भवन, भूखंड क्र.12/13, तिसरा मजला, सेक्टर-3, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी घेण्यात येईल. तसेच दि. 8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या दिवशी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच पुरस्कार वितरण समारंभ विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी या ठिकाणी संपन्न होणार आहे. या स्पर्धांमधील सहभाग, पुरस्कारासाठीची नामांकने व वस्तु विक्री स्टॉल करिता आवश्यक अर्ज सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर येथे उपलब्ध आहेत. या स्पर्धांमधील सहभागाकरीता अर्ज करण्याचा अंतिम दि. 02 मार्च 2026 असून पुरस्कार व वस्तु विक्री स्टॉल करीता अर्ज करण्याचा अंतिम दि. 04 मार्च 2026 असणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे दि. 8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांकरीता ‘पैठणी लकी ड्रॉ’ स्पर्धा कार्यक्रमाचे ठिकाणी घेण्यात येणार आहे. पुरस्कार नामांकन व विक्री स्टॉल बाबतची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच अर्जही स्विकारले जातील.
उक्त विक्री स्टॉल उपलब्ध करुन घेण्यासाठी फक्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था अर्ज करू शकतात. दाखल केलेल्या अर्जांपैकी एक अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार नमुंमपा आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांनी राखून ठेवला आहे याची नोंद घेण्यात यावी.
विभागनिहाय संपर्कध्वनी व समन्वयक -
- मिथून म्हात्रे 9867231403, बेलापूर
- प्रियंका पाटील 9082311440, नेरुळ
- सुंदर परदेशी 9594841666, वाशी व तुर्भे
- दादासाहेब भोसले 9372106976, कोपरखैरणे व घणसोली
- दशरथ गंभिरे 9702309054, ऐरोली व दिघा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai