सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 16
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ एक महिना शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील 8 विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व गुढीपाडवा, श्रीराम नवमी आणि महावीर जयंती या सार्वजनिक सुट्टींच्या दिवशीही सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.
नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी 8 विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून तेथे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच पालिकेची वेबसाईट, ॲप, सर्व बँकांचे डेबिट कार्ड, आरटीजीएस, सर्व प्रकारच्या यूपीआय सुविधा याव्दारे ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही महापालिका कार्यालयात अथवा कर संकलन केंद्रात जावे न लागता घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवरून कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता मालमत्ता कर विभागाच्या वतीने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आलेली असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा तसेच थकबाकीदारांवर होणारी कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत मालमत्ता कर विहित वेळेत भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai