सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 21
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पण भावनेने केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा असून आज सेवानिवृत्तीचा हा निरोप समारंभ नसून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव समारंभ आहे अशा शब्दात नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या दिलखुलास मनोगतातून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून माहे डिसेंबर 2025, जानेवारी व फेब्रुवारी 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या 28 अधिकारी, कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सन्मान समारंभ महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या सेवानिवृत्ती सन्मान समारंभामध्ये डिसेंबर 2025 महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहाय्यक लेखा अधिकारी वसंत म्हात्रे, मुख्याध्यापिका नलिनी चौधरी, इंदिरा पाटील, वंदना राऊत, प्राथमिक शिक्षक चंदू भदाणे, नेहा पालव, पद्मिनी तांबे, अधिक्षक प्रकाश वाकचौरे, सहाय्यक अभियंता विकास वखारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता चौधरी, सिस्टर इन्चार्ज पुष्पा गुप्ता, स्टाफ नर्स मिथिला शिंदे, सहाय्यक अधिसेविका श्रीम.कल्पना कोळेकर, ऑक्झलरी नर्स मिडवाईफ जयंती पुजारी, वाहनचालक भागवत कोरडे, सफाई कामगार शकुंतला म्हस्के, सफाई कामगार भानुदास रसनभैरे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे जानेवारी 2026 महिन्यात सेवानिवृत्त झालेले स्वच्छता अधिकारी विजय पडघन, प्राथमिक शिक्षिका मीनाक्षी हिंगे, अधिक्षक श्वेता लोखंडे तसेच फेब्रुवारी 2026 महिन्यात सेवानिवृत्त झालेले उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, मुख्याध्यापक महेश पाटील, मेट्रन रेचल पटनीगिरे, आरोग्य सहाय्यक बाळकृष्ण वर्ये, समुदाय समन्वयक मोहन गायकवाड, वाहनचालक दत्तात्रय पाटील यांचाही शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्यासमवेत महापालिका सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेणारे उपमुख्य लेखा वित्त अधिकारी तथा उपमुख्य लेखा परीक्षक श्याम पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आपल्या सहकाऱ्यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देताना महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai