गावठाण क्षेत्रात श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 18
नवी मुंबई ः महाराष्ट्रभूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महास्वच्छता मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गावांमध्ये तसेच पालिकेच्या पाचही रूग्णालय परिसरात उत्साहाने राबविण्यात आली. यामध्ये प्रतिष्ठानच्या 2710 श्रीसदस्यांच्या समवेत महापौर, उपमहापौर, अतिरिक्त आयुक्त, पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह 3500 हून अधिक नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला.
स्वच्छतेमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या नवी मुंबई शहराला लाभलेली स्वच्छतेमधील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील मानांकने यामध्ये येथील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. यामध्ये विशेषत्वाने डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवंदडा, अलिबाग यांच्यामार्फत सातत्यपूर्ण राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहीमा प्रत्यक्ष स्वच्छतेप्रमाणेच आंतरिक सेवाभावालाही चालना देतात. या मोहीमेमध्ये 26 गावांतील गावठाण क्षेत्र तसेच 5 महापालिका रूग्णालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या अंतर्गत 10885 कि.ग्रॅ. कचरा साफ करण्यात येऊन उचलून नेण्यात आला. साधारणत: 118.45 कि.मी. चा परिसर अभियानामध्ये स्वच्छ करण्यात आला. महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्याप्रती असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी श्रीसदस्यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरात राबविलेला हा महास्वच्छता अभियान उपक्रम सर्वांच्या एकत्रित सहयोगाने यशस्वीरित्य संपन्न झाला.
- ओला कचरा-13.9 टन, सुका कचरा-19.751 टन गोळा
उरण ः महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ उरण शहर व परिसरात डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मभूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मार्च 2026 रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 1577 श्री सदस्यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेत ओला कचरा-13.9 टन,सुका कचरा-19.751टन गोळा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राबविलेल्या स्वच्छता अभियानाला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मोहिमेत उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियानात भाग घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai